Top
Home > News Update > जळगाव : ४ अल्पवयीन भावंडांची निर्घृण हत्या, राज्य हादरलं

जळगाव : ४ अल्पवयीन भावंडांची निर्घृण हत्या, राज्य हादरलं

जळगाव : ४ अल्पवयीन भावंडांची निर्घृण हत्या, राज्य हादरलं
X

चार सख्ख्या अल्पवयीन भावंडांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात घडला आहे. रावेर शहरात जवळच असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेतातील एका घरात चार लहान अल्पवयीन मुलांचा खून झाल्याचे आढळून आले आहे.

शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील मुस्‍तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या पती-पत्नी आपल्या मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) या मूळ गावी गेले होते. घरी त्यांची चारही मुले एकटी होती. या चौघांचा खून झाल्याचे शेत मालकाला सकाळी आढळून आले आहे.

याबाबत विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चौघांचा कुऱ्हाडीने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Updated : 2020-10-17T14:00:48+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top