Top
Home > News Update > मुंबई मेट्रो अडथळ्याचे कारण शोधायचे असेल तर फडणवीसांनी स्वतःला आरशात पाहावे - सचिन सावंत

मुंबई मेट्रो अडथळ्याचे कारण शोधायचे असेल तर फडणवीसांनी स्वतःला आरशात पाहावे - सचिन सावंत

मुंबई मेट्रो अडथळ्याचे कारण शोधायचे असेल तर फडणवीसांनी स्वतःला आरशात पाहावे - सचिन सावंत
X

फडणवीस सरकारला जे करता आलं नाही ते काम आम्ही करू परंतु मोदी सरकार जाणीवपूर्वक मेट्रोचे काम पूर्ण होण्यास अडथळे आणत आहेत. फडणवीस सरकारने खाजगी विकासकाला जास्त प्राधान्य दिल्याने हा प्रकल्पाला अडथळा निर्माण झाला असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांनी केलेल्या टिकेला प्रतिउत्तर दवताना म्हणाले.

देवेंद्र फडणवीस दिल्ली मेट्रो मध्ये फिरले त्यांनी त्याची कौतुक केलं त्याचा आम्हाला आनंद आहे. दिल्लीतील सर्व मेट्रोच जाळं हे शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने केलं होतं. काम कसं असतं याचा त्यांनी अनुभव घेतला. मुंबई मध्ये जी एकमेव मेट्रो सुरू आहे ती देखील आघाडी सरकारने सुरू केली आहे. फडणवीस सरकारला जे करता आलं नाही ते काम आम्ही करू. परंतु मोदी सरकार जाणीवपूर्वक काम पूर्ण होण्यास अडथळे आणत आहेत हे दूर करण्यासाठी त्यांनी विनंती करावी असे फडणवीसांनी केलेल्या टीकेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिउत्तर दिले.

दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी मुंबईतील मेट्रोवरून महाविकास आघाडीवर टीका केली होती. मुंबईमध्ये असा प्रवास कधी करता येणार? महाविकास आघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळामुळे मेट्रोचे काम पूर्ण होत नसल्याची टीका फडणवीसांनी केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देताना सावंत पुढे म्हणाले, फडणवीस सरकारने मोट्रोच काम पूर्ण होण्याची अंतिम तारीख २०१९ दिली होती. पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांना हे काम पूर्ण करता आले नाही. पाच वर्षे हा प्रकल्प थांबलं अशी जी चिंता फडणवीस व्यक्त करत आहेत. पण करशेडचा फ्लॅट तिथेच आहे. फडणवीस सरकारने खाजगी विकासकांचे हित हे लोकांच्या हिता पेक्षा जास्त महत्वाचे मानले. खाजगी विकासकाला जास्त प्राधान्य दिल्याने हा प्रकल्पाला अडथळा निर्माण झाला आहे. अडथळ्याचे कारण शोधायचे असेल तर फडणवीसांनी स्वतःला आरशात पाहावे

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा डाव मोदींचा हेतू हा मुंबईला, महाराष्ट्राला कमजोर करण्याचा होता. या सहा वर्षीत मुंबई, मुंबई पोलीस यांची बदनामी करण्यात आली. मुंबईचे उद्योग व आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र ज्या प्रकारे गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला यावेळी फडणवीस सरकार गप्प बसून हेते. मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा त्यांचा हेतू होता. मोदी सरकारने किंवा भाजपने मुंबईकडे वाकडी नजर केली तर महाराष्ट्रात राजकारण करणं वघड होईल. महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही. असा घणाघात सावंत यांनी यावेळी केंद्र सरकारवर केला आहे.

Updated : 28 Jan 2021 2:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top