Home > News Update > Mumbai CNG Crisis : पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा, मुंबईकरांचे हाल

Mumbai CNG Crisis : पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा, मुंबईकरांचे हाल

Mumbai CNG Crisis : पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा, मुंबईकरांचे हाल
X

गेल्या दोन दिवसांपासून महानगर गॅसच्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत CNG पुरवठा ठप्प आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी सेवा कोलमडली आहे. रिक्षा वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं नोकरदार वर्ग, विद्यार्थी इतर प्रवाशांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महानगर गॅसच्या MGL मुख्य पुरवठा पाईपलाईनला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक पंपावर सीएनजी बंद असे बोर्ड लावण्यात आले आहे. ज्यामुळे टॅक्सी, रिक्षाचालकांना त्रास सहन करावा लागतोय. सीएनजी सेवा आज संध्याकाळ पर्यंत सुरु होण्याचं सांगितलं जात आहे.

रिक्षा-टॅक्सीचालकांना शारिरीक, मानसिकत्रासासोबत आर्थिक नुकसानही होत आहे. तसेच नोकरदार वर्गाकडून रस्त्यावर २ -२ तास रांगेत उभे राहिल्यामुळे कार्यालयात लेटमार्क लागण्याची चिंता व्यक्त होत असून तसेच याचा परिणाम महिन्याच्या पगारावर होणार असल्याच बोललं जात आहे.

धावत्या मुंबईत एक वाहतूक सेवा ठप्प झाली की संपूर्ण मुंबईला याचा फटका बसत असतो. सध्या बससाठी बसस्टॉपवर लांबचलांब रांगा आहेत. बसेसमध्ये गर्दी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. दरम्यान ओला-उबर वाहतूक सेवा उपलब्ध होत आहे परंतु परिस्थिती पाहता ओला-उबर ड्रायव्हर आगाऊ पैसे घेत असल्याचं प्रवाशांनी अनेक माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Updated : 18 Nov 2025 11:32 AM IST
Next Story
Share it
Top