Home > News Update > मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णय क्षमतेवर राज ठाकरेंचं प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णय क्षमतेवर राज ठाकरेंचं प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णय क्षमतेवर राज ठाकरेंचं प्रश्नचिन्ह
X

सध्या राज्यात प्रश्न भरपूर आहेत पण सरकारचे निर्णय मात्र दिसत नाहीयेत, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी ही टीका केली आहे. लोकल सुरू झालेल्या नाहीयेत, लोकांना वाढीव वीज बिलं आली आहेत, हॉटेल सुरू केल्या आहेत पण मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत, अशी टीका करत सरकार का एवढे संथपणे काम करत आहे, असा सवालही त्यांनी विचारला आहे. सरकार एवढे कुंथत कुंथत का चालवले जात आहे या शब्दात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सरकारने १ ते २ दिवसात निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलांसंदर्भात गुरूवारी सकाळी राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अदानी कंपनी आणि बेस्टच्या अनेक लोकांनी आपली भेट घेतली, त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आणि आता राज्यपालांनी सरकारला वीज बिलं कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगावे या मागणीसाठी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली. हे वीज बिल कमी करायला कंपन्या तयार आहेत, सरकार तयार आहे पण बिलं कमी करणे कुठे अडले आहे असा सवालही त्यांनी विचारला आहे.

यासंदर्भात शरद पवारांची भेट तर घेणारच आहे पण वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे असेही राज ठाकरेंनी सांगितले आहे. सध्या राज्यपाल आणि सरकारजे सख्य आहे ते पाहता त्यांचे बोलणे होईल का आणि त्यावर निर्णय होईल ते पहावे लागेल असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे.



Updated : 29 Oct 2020 6:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top