Home > News Update > शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये 'वर्षा बंगल्यावर' मध्यरात्री चर्चा ; राज्यसभेची गणितं बदलणार ?

शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये 'वर्षा बंगल्यावर' मध्यरात्री चर्चा ; राज्यसभेची गणितं बदलणार ?

शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये वर्षा बंगल्यावर मध्यरात्री चर्चा ; राज्यसभेची गणितं बदलणार ?
X

राज्यसभा उमेदवारी निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना मंगळवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतं झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) तब्बल अडीज तास चर्चा रंगली होती. महाराष्ट्रात राज्यसभेच्या (Rajya Sabha Election ) ६ जागा असून सर्वच जागांवर महायुतीने उमेदवार उतरवण्याचा प्लॅन आखलं गेल्याची माहिती अशी माहिती सुंत्राकडून मिळतं आहे. मात्र, त्यासाठी उमेदवार कोणते? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. यासंदर्भात आज महायुतीकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला (INC) सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमधील (BJP) राज्यसभेची गणित बदलणार आहेत. भाजप राज्यसभेसाठी चार उमेदवार देण्याची तयारी करत आहे. याशिवाय अजित पवार गट आणि शिंदे गट प्रत्येकी १ जागेवर उमेदवार उतरवणार असल्याचं सूत्रांनी सांगण्यातं आलं आहे. महायुतीच्या या गणितामुळे महाविकास आघाडीला (MVA) राज्यसभेत एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. आज महायुतीच्या उमेदवाराची यादी समोर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात राज्यसभा मताचं गणित असं असण्याची शक्यता

२८८ पैकी २८४ आमदार राहिल्याने मतांचा कोटा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ४०.५७ इतका आहे. भाजपकडे १०४ आमदार अन्य १३ अपक्ष आमदारांची मतं असल्यानं ११७ मतांचं मतधिक्य आहे. त्यानुसार भाजपच्या ३ जागा सहजपणे निवडून येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाकडे प्रत्येकी ४० आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचाही १-१ उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसकडे ४५ आमदारांचं संख्याबळ असल्याने त्यांची एक जागा निवडून येऊ शकते. त्यांना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा आहे.

Updated : 14 Feb 2024 3:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top