Home > News Update > Maharashtra Municipal Corporation Election Results : आज २९ महानगरपालिकांचे निकाल होणार स्पष्ट !

Maharashtra Municipal Corporation Election Results : आज २९ महानगरपालिकांचे निकाल होणार स्पष्ट !

Maharashtra Municipal Corporation Election Results : आज २९ महानगरपालिकांचे निकाल होणार स्पष्ट !
X

Maharashtra Municipal Corporation Election Results महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पिंपरी-चिंचवड यासह इतर महापालिकांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेची मतमोजणी विशेष

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२७ प्रभागांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी मुंबईत २३ वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आला असून, सुमारे २,२९९ अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. सकाळी १० वाजेपासून सुरू होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निकालामुळे राज्याच्या आर्थिक राजधानीवर कोणाचा वर्चस्व राहील, हे स्पष्ट होणार आहे.

एक्झिट पोलमधील अंदाज

मतदान संपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलनुसार, मुंबईत भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही एक्झिट पोलमध्ये महायुतीला १३० ते १५० जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित प्रयत्नांना मोठा फटका बसण्याची शक्यता दाखवली जात आहे. मात्र, हे फक्त अंदाज असून अंतिम निकाल मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

एकूण मतदान आणि उमेदवार

राज्यातील २९ महापालिकांसाठी सुमारे ३.४८ कोटी मतदारांनी १५,९३१ उमेदवारांच्या नावावर आपला कौल दिला. मतदानाची सरासरी टक्केवारी ४६ ते ५० टक्क्यांच्या आसपास राहिल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. काही ठिकाणी ईव्हीएम बिघाड, शाई पुसण्याचे आरोप आणि बोगस मतदानाच्या तक्रारी आल्या होत्या. परंतु मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड : भाजप आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

ठाणे, नागपूर : स्थानिक नेत्यांच्या कामगिरीवर निकाल अवलंबून आहे.

छत्रपती संभाजीनगर : येथेही महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळतेय.

संपूर्ण निकाल संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर (mahasec.maharashtra.gov.in) लाईव्ह अपडेट्स उपलब्ध होतील.

या निवडणुकीच्या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अधिक अपडेट्ससाठी मॅक्स महाराष्ट्रचे युट्यूब, फेसबुक नक्की पाहा.


Maharashtra Municipal Corporation Election Results, BMC Election Results, Mumbai Municipal Corporation Election, Maharashtra Civic Polls, Election Results Live Updates

Updated : 16 Jan 2026 7:50 AM IST
Next Story
Share it
Top