विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाहीच!

राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर देखील संकट आलं होतं. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुकांना हिरवा झेंडा दाखवल्यानं राज्यात ९ जागांसाठी २१ मे ला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे.

प्रत्येक पक्षाचं विधानसभेतील पक्षबळ पाहता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज येतो. एक जागा निवडून येण्यासाठी ३२ मतदानांची गरज (कोटा) आवश्यक आहे. त्यामुळं भाजपच्या ३ जागा सहज निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने चार जागा उभ्या केल्या आहेत.

त्यामुळं भाजपला १२८ मतांची आवश्यकता आहे. मात्र, इतकं संख्याबळ भाजपकडं असणाऱ्या आकड्यामधून तरी दिसून येत नाही. त्यातच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना देखील दोन उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं निवडणूक आकड्यांवर नजर टाकली तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. हे स्पष्ट होतं….

विधानसभेतील पक्ष निहाय संख्या बळ

भाजप १०५
शिवसेना ५६
राष्ट्रवादी काँग्रेस ५४,
काँग्रेस ४४,
बहुजन विकास आघाडी ३,
समाजवादी पार्टी – २,
एम आय एम – २,
प्रहार जनशक्ती – २,
मनसे – १,
माकप – १,
शेतकरी कामगार पक्ष – १,
स्वाभिमानी पक्ष – १,
राष्ट्रीय समाज पक्ष – १,
जनसुराज्य पक्ष – १,
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १ आणि
अपक्ष – १३

वरील आकडेवारी नुसार भाजपकडे तीन जागा निवडून येण्याचं संख्याबळ असताना राज्यातील विधान परिषदेच्या चार जागा घोषित केल्या आहेत. भाजपने गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिली आहे. त्यामुळं भाजप अपक्षांचा आधार घेऊन ही निवडणूक जिंकणार का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.

हे ही वाचा…


काँग्रेसकडून मोदी उमेदवार

ठाकरे सरकारचं प्रशासन कुचकामी ? माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

पडळकर इन, जानकर आऊट?

वाघांनो असं रडताय काय? पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना ट्विट…

तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ने अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे ह्याच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवार असतील हे निश्चित मानलं जात आहे.

त्यातच कॉंग्रेस आपला एक उमेदवार जाहीर करेल असं बोललं जात असताना काल कॉंग्रेस ने जाहीर केलेल्या यादीत दोन उमेदवारांना संधी दिली आहे. कॉंग्रेस ने राजेश धोंडीराम राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीने जर ही निवडणूक अपक्षांना बरोबर घेऊन लढवली तर त्यांच्या 6 जागा निवडून येऊ शकतात.

त्यामुळं समाजवादी पार्टी २, एम आय एम २, , मनसे १, माकप १, आणि अपक्ष १३ या आमदारांवरच 9 व्या जागेचं भवितव्य ठरणार आहे.