JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलल्या

Government of Maharashtra cancels final year exams
Courtesy: Social Media

कोरोच्या संकटामुळे देशभरातील शाळा, कॉलेजेस आणि विद्यापीठांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. पण विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या JEE आणि NEET या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.

मेडिकलसाठीची प्रवेश परीक्षा NEET आणि इंजीनिअरिंगची परीक्षा JEE पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता सध्या या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. JEE मेन परीक्षा १ ते सहा सप्टेंबर, JEE एडव्हान्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि आणि NEET परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.

हे ही वाचा..

आत्महत्येच्या घटनेचे वार्तांकन करताना घ्यावी लागणार खबरदारी

इंधन दरवाढ, नवा दृष्टीकोन

आत्महत्येच्या घटनेचे वार्तांकन करताना घ्यावी लागणार खबरदारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here