Home > News Update > महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान आहे का ?

महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान आहे का ?

महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान आहे का ?
X

वर्षपुर्तीकडे जाणारे महाविकास आघाडी सरकार बिहार विधानसभा निवडणुकीनंतर बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, असं भविष्य वंचीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केल्यानंतर आता पुन्हा राज्यातले महाविकास आघाडी सरकार पडणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारीच लाईवच्या माध्यमातून मंदीरं, लोकल आणि जिम सुरु होणार नाही, असं स्पष्ट केलं असताना

भाजपकडून आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करुन मंदीरं उडणाची मागणी म्हणजे सुनियोजीत घटनाक्रम असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची एक सुध्दा संधी भाजपकडून सोडली जात नाही. सातत्यानं भाजप नेंते राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना भेटून राष्ट्रपती राजवटची मागणी करत आहेत. प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी आणि त्यानंतर राज्यपालांचे मंदीर उघडण्याठीचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र या षडयंत्राचा भाग असल्याचे सांगितलं जात आहे. राज्यात एकाबाजूला सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे.

तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी या पत्राला जोरदार प्रत्युत्तर देत, जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच असल्याचं म्हटलं आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर देत ठाकरे म्हणतात, महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही .

Have you suddenly turned 'Secular' yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा 'Secularism' आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही .

इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसात राज्यपाल- सरकार मधील वाद थंडावला असला तरी मंदीर उघडण्याचे मागणीवर राज्यपाल- मातोश्री वाद पुन्हा उफाळल्यानं राज्य सरकार अस्थिर करण्याचं षडयंत्र तर शिजत नाही ना? अशी शंका आता उपस्थित होत आहे.


Updated : 13 Oct 2020 11:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top