मुंबईच्या महापौर पदासाठी 28 जानेवारीचा मुहुर्त ?
Is January 28th the right time for the post of Mumbai Mayor?
X
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात नगरसेवकांच्या मतदानातून मुंबई महापौरांची निवड केली जाणार आहे. सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवारालाच महापौर म्हणुन घोषित करण्यात येईल. महानगरपालिका प्रशासनाने बोलावलेल्या विशेष सभेत ही निवड २८ जानेवारी २०२६ या दिवशी होण्याची शक्यता असल्याच सूत्रांनी सांगितले आहे. महापौर आणि उपमहापौरांची निवड सभागृहातील नगरसेवकांच्या मतदानातून केली जाते. ज्याला सर्वाधिक मते मिळतील, तो महापौर आणि उपमहापौर म्हणून घोषित केला जातो.
सर्वाधिक नगरसेवक असलेल्या पक्षालाच महापौरपद मिळेल, असे बंधनकारक नसले, तरी आजपर्यतच्या पद्धतीनुसार स्पष्ट बहुमत असलेल्या पक्षालाच हे मानाच पद मिळाले आहे. शिवसेना (उबाठा) च्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यावेळीही नगरसेवक म्हणून निवडुन आल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात लॉटरी काढून महापौरपदाचे आरक्षण ठरवलं जाणार आहे. यात खुला प्रवर्ग, महिला किंवा आरक्षित प्रवर्ग असे यापैकी कुठल्याही एका प्रवर्गासाठी हे आरक्षण सुटणार आहे. आरक्षणाच्या लॉटरीनंतर काही दिवसांनी महापौर निवडणूक होणार असून, त्यामुळे ती जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे.
मुंबईचा महापौर कसा निवडला जातो ?
महापौर निवड प्रक्रियेची सुरुवात नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणासाठी लॉटरी काढुन होते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर पात्र नगरसेवक आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करतात. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष सभेत निवडणूक घेतली जाते. सर्व निवडून आलेले नगरसेवक मतदान करतात आणि सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येपैकी निम्म्याहून अधिक मते मिळवणारा उमेदवार महापौर म्हणून निवडला जातो.
स्वीकृत नगरसेवकांचा निकालावर प्रभाव
227 निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सभागृहात यावेळी 10 स्वीकृत नगरसेवक असतील, जी पहिलीच महापौर निवडणूक ठरणार आहे. मार्च २०२३ मध्ये मुंबई महानगरपालिका कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्यात आली आहे.
भाजप हा सर्वाधिक नगरसेवक असलेला एकमेव पक्ष म्हणून पुढे आल्याने, स्वीकृत नगरसेवकांपैकी मोठा वाटा भाजपला मिळण्याची शक्यता आहे, सर्वाधिक नगरसेवक असलेल्या पक्षालाच महापौरपद मिळते असे नाही, मात्र संख्याबळ किंवा जास्त समर्थन हेच बहुतेक वेळा निकाल ठरवत असे मागील निवडणुकीतून दिसून आलेले आहे.






