IndiGo Flight Cancellations : हे सरकारच्या मक्तेदारीचं मॉडेल, राहुल गांधींची खरमरीत टीका
X
देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स Indigo इंडिगोने शुक्रवारी ४०० विमानउड्डाणं रद्द केल्यामुळे विमानप्रवाशांच्या होणाऱ्या गैरसुविधेवर Rahul Gandhi कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. इंडिगोचे अपयश ही सरकारच्या मक्तेदारीचं मॉडेल आहे. उशीर, रद्दीकरण, असहाय्यतेचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. भारत प्रत्येक क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धेला पात्र आहे मॅच-फिक्सिंगच्या मक्तेदारीला नाही अशी खरमरीत टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
इंडिगोमध्ये लागू केलेल्या नवीन नियमावलीचा परिणाम देशभरातील विमान प्रवाशांवर होऊ लागला आहे. गेल्या चार दिवसांपासून विमानउड्डाणं उशीरानं किंवा रद्द् करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील विमानतळावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. विमानतळाला रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीचे स्वरूप आलं आहे. इंडिगो एअरलाईन्समधील गोंधळामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.
विमानतळावर बॅगाच बॅगा पाहायला मिळत आहे. अनेक विमानप्रवाशी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत इंडिगोकडून होणाऱ्या असुविधेबाबत बोलत आहे.
यावर देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकतंच एक्स वर पोस्ट केली आहे. पाहा काय म्हणताहेत...
भारत प्रत्येक क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धेला पात्र आहे, मॅच-फिक्सिंग मक्तेदारीला नाही.






