Home > News Update > Industrial Production Index : भारताचे औद्योगिक उत्पादन नोव्हेंबरमध्ये वाढले, आयआयपीमध्ये 'इतकी' झाली वाढ

Industrial Production Index : भारताचे औद्योगिक उत्पादन नोव्हेंबरमध्ये वाढले, आयआयपीमध्ये 'इतकी' झाली वाढ

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत औद्योगिक उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत दर महिन्याला आयआयपीमध्ये वाढ नोंदवली गेली आहे.

Industrial Production Index : भारताचे औद्योगिक उत्पादन नोव्हेंबरमध्ये वाढले, आयआयपीमध्ये इतकी झाली वाढ
X

मुंबई : भारताच्या औद्योगिक उत्पादनात नोव्हेंबर महिन्यात वाढ झाली आहे. भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) नोव्हेंबर 2023 मध्ये सुमारे अडीच टक्क्यांनी वाढला. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये देखील आयआयपीमध्ये वाढ झाली होती. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीची माहिती दिली.

नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 141 वर होता. हा आकडा एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 2.4 टक्के अधिक आहे. ऑक्टोबर 2023 च्या सुरुवातीला आयआयपी 144.5 वर होता. हा मागील वर्षाच्या तुलनेत 11.7 टक्के अधिक होता. ऑक्टोबर महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात 16 महिन्यांतील सर्वात वेगवान वाढ नोंदवण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत औद्योगिक उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत दर महिन्याला आयआयपीमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात आयआयपी वाढीचा वेग मंदावला आहे. आठ महिन्यांतील ही सर्वात कमी वाढ आहे. यापूर्वी, मार्च 2023 मध्ये आयआयपीमध्ये सर्वात कमी वाढ 1.7 टक्के होती.

दुसरीकडे किरकोळ महागाईची आकडेवारीही जाहीर करण्यात आली. डिसेंबर 2023 मध्ये किरकोळ चलनवाढीत काही वाढ नोंदवली गेली आहे. आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.69 टक्के होता. त्याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाई 5.55 टक्के होती. डिसेंबरमधील किरकोळ महागाई 4 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.
Updated : 13 Feb 2024 3:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top