Home > News Update > सर्वसामान्यांना दिलासा; किरकोळ महागाई जानेवारी 2024 मध्ये 5.10 टक्क्यांवर

सर्वसामान्यांना दिलासा; किरकोळ महागाई जानेवारी 2024 मध्ये 5.10 टक्क्यांवर

किरकोळ महागाईची आकडेवारी 12 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

सर्वसामान्यांना दिलासा; किरकोळ महागाई जानेवारी 2024 मध्ये 5.10 टक्क्यांवर
X

महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशातील किरकोळ महागाईचा दर जानेवारीमध्ये 5.10 टक्क्यांवर आला आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई दर 5.69 टक्के होता.

किरकोळ महागाईची आकडेवारी 12 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी अपेक्षेनुसार आहे. 2024 च्या पहिल्या महिन्यात वार्षिक आधारावर किमती 5.09 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली होती.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडे सलग सहाव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. ऑगस्ट 2023 मध्ये महागाईने 6.83 टक्क्यांची सर्वोच्च पातळी गाठली.

किरकोळ महागाईत घट झाली असली तरी भाज्यांची भाववाढ झाली आहे. भाज्यांचा भाव 25 टक्क्यांच्या वर तर डाळींचा भाव 20 टक्क्यांच्या जवळपास आहे. यामुळे जानेवारी 2024 मध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 8.30 टक्के राहिला आहे. डिसेंबर 2023 च्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये डाळींच्या महागाईत किंचित घट झाली आहे. जानेवारीमध्ये डाळींचा महागाई दर 19.54 टक्के होता. डिसेंबर 2023 मध्ये दर 20.73 टक्के होता.भाज्यांच्या महागाई दरातही किंचित घट झाली असून डिसेंबरमधील 27.64 टक्क्यांवरून तो 27.03 टक्क्यांवर आला आहे. धान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दर डिसेंबरमध्ये 9.93 टक्के होता. जानेवारीत हा दर 7.83 टक्के आहे. डिसेंबरमध्ये महागाईचा दर 19.69 टक्क्यांवरून 16.36 टक्क्यांवर आला आहे. फळांच्या महागाईचा दरही कमी झाला असून तो 8.65 टक्के झाला आहे. डिसेंबर 2023 मध्ये फळांच्या महागाईचा दर 11.14 टक्के होता.किरकोळ महागाई 5 टक्क्यांच्या आसपास खाली आली आहे. महागाई आरबीआयच्या सहनशीलतेच्या कक्षेत आहे. पण महागाई दर 4 टक्क्यांवर आणण्याचे आरबीआयचे लक्ष्य आहे. आरबीआयच्या मते, 2024-25 मध्ये महागाई दर 4.5 टक्के असेल. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाईचा दर अन्नधान्याच्या चलनवाढीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असेल. जागतिक तणावामुळे केवळ पुरवठ्याच्या समस्याच नाहीत तर कच्च्या तेलाच्या किमतीतही चढ-उतार दिसून येत आहेत. अशा स्थितीत व्याजदरातून दिलासा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.Updated : 13 Feb 2024 1:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top