Quick Commerceमध्ये भारताची गरुडझेप, China आणि Americaनंतर India जगात तिसऱ्या क्रमांकावर!
X
जगभरात आर्थिक मंदीचे सावट असताना Indian market भारतीय बाजारपेठेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. १० ते ३० मिनिटांत delivery डिलिव्हरी देणाऱ्या 'क्विक कॉमर्स' (Quick Commerce) क्षेत्रात India भारताने जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत चीन China पहिल्या तर अमेरिका America दुसऱ्या क्रमांकावर असून, भारताने युरोपातील अनेक विकसित देशांना मागे टाकत हे स्थान मिळवले आहे.
पश्चिमात्य देशांमध्ये १० मिनिटांचे मॉडेल' तोट्यात जाऊन बंद पडत असताना भारताने मात्र 'क्विक कॉमर्स' मॉडेल यशस्वी करून दाखवले आहे.
जगातील टॉप ३ क्विक कॉमर्स बाजारपेठा Quick Commerce market
१. लोकसंख्या आणि प्रगत सप्लाय चेनमुळे चीन या क्षेत्रात निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे.
२. अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठी असल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तरीही तिथे 'इन्स्टंट डिलिव्हरी'चे प्रमाण भारताच्या तुलनेत कमी वेगाने वाढत आहे.
३. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमधील प्रचंड मागणीमुळे भारताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
भारतात 'क्विक कॉमर्स'यशस्वी का ठरले? Why is Quick Commerce successful in India
पाश्चिमात्य देशांमध्ये लेबर कॉस्ट (कामगार खर्च) जास्त असल्याने आणि लोकसंख्या विरळ असल्याने १० मिनिटांत डिलिव्हरी देणे परवडत नाही. मात्र, भारतासाठी खालील गोष्टी 'गेमचेंजर' ठरल्या आहेत
डार्क स्टोर्सचे जाळे (Dark Store Density):भारतात दाट लोकवस्ती असल्याने, २-३ किलोमीटरच्या परिघात हजारो ग्राहक मिळतात. त्यामुळे कंपनीला एकाच छोट्या गोदामातून (Dark Store) अनेक ऑर्डर्स पूर्ण करता येत असल्याने डिलिव्हरी खर्च कमी होतो.
किराणा दुकानाची जागा: भारतीय ग्राहकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू (दूध, भाजीपाला) वारंवार विकत घेण्याची सवय आहे. क्विक कॉमर्सने आता आपल्या पारंपारिक 'किराणा दुकानाची' जागा डिजिटल स्वरूपात घेतली आहे.
केवळ किराणा नाही, तर सर्व काही: सुरुवातीला फक्त किराणा मालापुरते मर्यादित असलेले हे ॲप्स आता इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्य प्रसाधने, गिफ्ट्स आणि सोन्याची नाणी सुद्धा १० मिनिटांत पोहोचवत आहेत. यामुळे कंपन्यांचा नफा (Profit Margin) वाढला आहे.
कोणत्या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे?
सध्या भारतीय बाजारपेठेत तीन प्रमुख कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे.
ब्लिंकिट (Blinkit): झोमॅटोच्या मालकीची ही कंपनी सध्या ४०-४५% मार्केट शेअरसह आघाडीवर आहे.
स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart): स्विगीच्या फूड डिलिव्हरी नेटवर्कचा फायदा घेत ही कंपनी वेगाने वाढत आहे.
झेप्टो (Zepto): १० मिनिटांच्या डिलिव्हरीची संकल्पना भारतात रुजवणारी ही स्टार्टअप कंपनी आता मोठ्या दिग्गजांना टक्कर देत आहे.
या स्पर्धेमुळे आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या जुन्या कंपन्यांनाही या शर्यतीत उतरणे भाग पडले आहे .
भारताची 'क्विक कॉमर्स'ची बाजरपेठ
बर्नस्टीन (Bernstein) आणि रेडसीर (Redseer) सारख्या जागतिक संस्थांच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत भारतीय क्विक कॉमर्स बाजारपेठ सुमारे ४.५ लाख कोटी रुपये पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता आता टियर-२ शहरांमध्येही विस्तारत आहे.






