Home > News Update > Dollar तेजीत, सोनं मंदीत!

Dollar तेजीत, सोनं मंदीत!

महाराष्ट्रात सोन्याचा दर किती?

Dollar तेजीत, सोनं मंदीत!
X

अमेरिकन Dollar rises डॉलर सहा महिन्यांच्या उच्चांकी जवळ पोहोचल्याने आणि डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीची शक्यता कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली. वाढत्या डॉलरच्या किमतीमुळे सोनं इतर चलनधारकांसाठी अधिक महाग झालं असून त्याचा थेट परिणाम जागतिक बुलियन मार्केटवर दिसत आहे.

सोन्याच्या किमतीत घसरण (Gold prices ड्रॉप)

सोमवारी स्पॉट गोल्डची किंमत 0.3% नी घसरून $4,051.48 प्रति औंस झाली. दरम्यान, डिसेंबर डिलिव्हरीसाठी अमेरिकन गोल्ड फ्युचर्स 0.7% वाढून $4,049.50 प्रति औंसवर पोहोचले. फ्युचर्समध्ये ही किरकोळ वाढ असली तरी स्पॉट मार्केटमध्ये दबाव कायम आहे.

महाराष्ट्रात सोन्याचा दर किती? (Gold price)

जागतिक बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या दबावाचा परिणाम दिसतोय . 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 23 हजार 600 प्रति तोळा एवढा आहे तर एक किलो चांदीचा दर हा 1 लाख 54 हजार एवढा आहे.

डॉलर मजबूत; व्याजदर कपात अनिश्चित

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या अमेरिकेच्या आर्थिक संकेतांनुसार सप्टेंबरमध्ये रोजगार वाढ वेगवान दिसली. यामुळे फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदर कपात करण्याची शक्यता नाही

शुक्रवारी डॉलर इंडेक्स जवळपास सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. सोन्याचे व्यवहार डॉलरमध्येच होत असल्याने इतर देशांना सोने खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने सोन्याच्या मागणीत दबाव दिसून येत आहे.

फेडच्या बैठकीत काय घडलं? Federal Reserve interest rate

गेल्या बुधवारी जाहीर झालेल्या फेडच्या ऑक्टोबर बैठकीच्या मिनिट्समध्ये महत्त्वाचे संकेत मिळाले. व्याजदर आणखी कमी केल्यास महागाई वाढण्याचा धोका फेडने व्यक्त केला आहे. फेडच्या संकेतामुळे व्याजदर कपातीची शक्यता मावळली आहे.

व्याजदर कमी झाल्यास सोन्याची कामगिरी चांगली होते. मात्र, सध्या व्याजदर धोरणाबाबत अनिश्चितता असल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत

Updated : 24 Nov 2025 1:39 PM IST
Next Story
Share it
Top