Home > News Update > महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं वायव्य दिशेला त्याच्या हालचाली होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे
X


आज (दि. २६ जुलै) सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं वायव्य दिशेला तिच्या हालचाली होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुढील पाच दिवस महाराष्ट्रात दिसण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं हवामान विभागानं महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना हाय अलर्टचा इशारा दिलाय. या सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. हा अलर्ट २६ आणि २७ जुलैसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय. तर २८, २९ जुलैसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गुरूवारी (२७ जुलै) विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोकणातील रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात २६ जुलै रोजी रेड अलर्ट तर २७ ते २९ जुलै ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ३० जुलैसाठी रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २७ जुलैला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

पुणे जिल्ह्यात २६, २७ जुलैसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. २७ ते २९ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यासाठी २६ जुलैला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. २७ जुलैला ऑरेंज अलर्ट तर २८ आणि २९ जुलैसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सातारा जिल्ह्यासाठी २६,२७ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. २८ जुलैला ऑरेंज अर्ट आणि २९, ३० जुलैला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना २७ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

दरम्यान ,भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Updated : 26 July 2023 3:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top