Home > News Update > गिरणी कामगारांचा संघर्षपुरुष मावळला : दिर्घ आजारानं दत्ता इस्वलकराचं निधन

गिरणी कामगारांचा संघर्षपुरुष मावळला : दिर्घ आजारानं दत्ता इस्वलकराचं निधन

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. गिरणी कामगारांच्या संपानंतर मुंबईतील हा श्रमिक वर्ग संपल्यात जमा होता, असे वाटत असताना इस्वलकर यांनी या लढ्यात प्राण फुंकून गिरणी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं होतं.

गिरणी कामगारांचा संघर्षपुरुष मावळला : दिर्घ आजारानं दत्ता इस्वलकराचं निधन
X

त्यांनी गिरणी कामगारांच्या वारसांना हक्काची मुंबईत घरे मिळवून दिली. जवळपास दहा हजार कामगारांना घरे मिळाल्याने त्यांची वाताहत थांबली. स्वतः गिरणी कामगार असल्याने इस्वलकर यांना कामगारांची दुःख जवळून माहीत होती. त्यांची थकीत वेतने यासह घरांसाठी इस्वलकर यांनी गेले तीन दशके लढा दिला.गिरणी संपामुळे कोलमडून पडला असताना इस्वलकर आणि त्यांच्या संघर्ष समितीमधील सहकार्‍यांनी कामगारांना उभे करण्याचे मोठे काम केले. यासाठी उपोषणे, आंदोलने आणि मोर्चा या लोकशाही मार्गाचा संयमी वापर करत त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवले. सर्वांना बरोबर घेऊन जात काम करण्याची त्यांची हातोटी वाखणण्याजोगी होती.

राज्यकर्त्यांना भेटून अतिशय शांतपणे कामगारांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवणे यात त्यांची हातोटी होती. अतिशय साधी राहणी असलेले इस्वलकर यांनी शेवटपर्यंत कामगारांच्या प्रश्नांचा विचार केला. कामगार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

ॉउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रध्दांजली वाहताना सांगितले की,राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते, ज्येष्ठ कामगार नेते दत्ता इस्वलकर साहेबांच्या निधनानं गिरणी कामगारांच्या हक्कासाठी जीवनभर संघर्ष करणारं ध्येयवादी नेतृत्वं हरपलं आहे. गिरणी कामगाराच्या पोटी जन्मलेले, स्वत: गिरणी कामगार असलेले दत्ता इस्वलकर हे गिरणी कामगारांच्या लढ्याला समर्पित व्यक्तिमत्वं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या कामगार चळवळीची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Updated : 7 April 2021 6:17 PM GMT
Next Story
Share it
Top