Home > News Update > सोन्याचे दर 60 हजारांच्या जवळ

सोन्याचे दर 60 हजारांच्या जवळ

सोन्याचे दर 60 हजारांच्या जवळ
X

गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या सोन्याच्या दरांनी गुरूवारी उच्चांक गाठलाय आहे. आठवडाभरापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. जळगावात गुरूवारी सराफा बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर जीएसटी मिळून 58 हजार 300 रुपये प्रतितोळा तर चांदीचे दर जीएसटी मिळून 77 हजार रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोने लवकरच 65 हजार आणि चांदी एक लाख रुपयांचा पल्ला गाठेल, असा सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे. सध्या कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. भारतासह अमेरिका, रशिया, चीन अशा देशातील बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून 'एक्सचेंज ट्रेडेड फंड' (ईटीएफ) मध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत.

हे ही वाचा...

कोरोनाचे नियम पाळा अन्यथा…..- तुकाराम मुंढे

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून?

रामाची बिनविरोध निवड!

त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदीला प्राधान्य देत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे सध्या सोने-चांदीसह सर्व मौल्यवान धातूंचे दर अस्थिर आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

एकाच आठवड्यात सोन्याचे सुमारे सहा ते साडेसहा हजाराने, तर चांदीचे दर 15 हजार रुपयांनी वाढले आहेत. सोने-चांदीच्या दरात आतापर्यंतची ही विक्रमी वाढ आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीचे दर सतत कमी जास्त होत आहेत. याचा सराफा बाजारातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.

Updated : 8 Oct 2020 12:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top