कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारताने रशियाला टाकले मागे…

Globally India is third country Having highest no of covid-19 cases

देशात दुसऱ्या दिवशी 25 हजारांच्या जवळपास कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात देशात 24 हजार 248 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 425 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19 हजार 663 एवढी झालेली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या सात लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे यापैकी 4 लाख 24 हजार 432 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. तर दोन लाख 53 हजार 287 रुग्णांवर सध्या देशभरात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा..

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने रशियाला आता मागे टाकलेले आहे.

रशियामध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या सहा लाख 80 हजार एवढी आहे. रुग्ण संख्येच्या बाबतीत भारत जगातील तिसरा देश असला तरी भारतात इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे, असं केंद्रीय आरोग्य विभागातर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान भारतात आतापर्यंत एक कोटींच्या जवळपास लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.

25 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here