“कोरोना संकट, नोटाबंदी, GSTचं अपयश भविष्यातील अभ्यासाचा विषय “

चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली असताना आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्ला केलेला आहे.

राहुल गांधी यांनी आज एक ट्विट केलं आहे, “कोरोना संकट हाताळण्यात अपयश, नोटबंदी आणि जीएसटीहेच्या अ यातील अपयश हे मुद्दे भविष्यात हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अभ्यासाचे विषय असतील”, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी केलेला आहे.

याच ट्विटमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी केलेला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. रविवारी तर या संख्येने उच्चांक नोंदवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी हे ट्विट केलेले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here