Home > News Update > वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या संघातील चार खेळाडूंना कोरोनाची लागण

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या संघातील चार खेळाडूंना कोरोनाची लागण

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या संघातील चार खेळाडूंना कोरोनाची लागण
X

कराची : पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या संघातील चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना क्रिकेट खेळता येणार नाही. वेस्ट इंडिज संघातील शेल्डन कॉट्रेल, ऑलराउंडर रोस्टन चेज आणि मध्यम गती गोलंदाज काइल मेयर्स यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. हे सर्वजण टी-२० संघामध्ये होते. तर रोस्टर चेज हा वनडे संघादेखील होता. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये संघातील आणखी एक व्यक्ती ही स्टाफ सदस्य आहे.

संघातील सर्वांना लस देण्यात आली होती. तरी देखील त्यांना कोरोनाची लागण झाली. ज्या खेळाडूंचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यापैकी कोणाला कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. संघातील अन्य खेळाडू आणि सदस्यांचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे.

वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याची सुरूवात टी-२० मालिकेने होणार आहे. याची सुरूवात सोमवारीपासून होणार आहे. या दौऱ्यामध्ये प्रत्येकी ३ सामन्यांची टी-२० आणि वनडे मालिका होणार आहे. ही संपूर्ण मालिका कराचीत खेळवली जाणार आहे. वनडे मालिका ही क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगचा भाग आहे.

Updated : 12 Dec 2021 5:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top