Home > News Update > Congress चे ज्येष्ठ नेते Shivraj Patil Chakurkar यांचं निधन

Congress चे ज्येष्ठ नेते Shivraj Patil Chakurkar यांचं निधन

Congress चे ज्येष्ठ नेते Shivraj Patil Chakurkar यांचं निधन
X

Congress काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री Former Home Minister शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झालं आहे. Latur लातूरमधील त्यांच्या देवघर या निवासस्थानी मंगळवार (१२ डिसेंबर २०२५) आज सकाळी साडे सहा च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. Shivraj Patil Chakurkar Passes Away

कोण होते शिवराज पाटील चाकूरकर ?

लातूरमधील चाकूर येथील मूळ रहिवासी असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक प्रभावी आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे सात वेळा यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले होते, ज्यामुळे या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड होती. आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

ते २००४ ते २००८ पर्यंत भारताचे गृहमंत्री होते.

१९९१ ते १९९६ दरम्यान त्यांनी लोकसभेचे १०वे सभापती म्हणूनही काम केले.

पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून २०१० ते २०१५ या काळात सेवा केली. तसेच देशाच्या संवैधानिक प्रक्रियेत त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण होता.

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आणि देशाच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. निष्ठावंत असं व्यक्तिमत्व जाण्यामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

Updated : 12 Dec 2025 8:27 AM IST
Next Story
Share it
Top