Home > News Update > मराठवाड्यात अतिवृष्टी : बीड जिल्ह्यात अनेक रस्ते बंद....ओल्या दुष्काळाचे संकट

मराठवाड्यात अतिवृष्टी : बीड जिल्ह्यात अनेक रस्ते बंद....ओल्या दुष्काळाचे संकट

मराठवाड्यात अतिवृष्टी :  बीड जिल्ह्यात अनेक रस्ते बंद....ओल्या दुष्काळाचे संकट
X

बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपले आहे. गेल्या 24 तासापासून पासून सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे गोदावरी नदी काठच्या 45 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी गंभीर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, यामुळे प्रशासन सतर्क आहे. तर बालाघाटाच्या डोंगर रांगेतील लहान-मोठे नदी-ओढ्यांना आलेल्या पुरामुळे तब्बल 22 गावांचा संपर्क तुटला आहे.



यातच धारूर- माजलगाव हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परळी- अंबाजोगाई महामार्गवरील कण्हेरवाडी परिसरातील नदीला आलेल्या पुरामुळे, हा महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. बीड, माजलगाव शहरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे.



बीड जिल्ह्यातील मांजरा,कुंडलिका, बिंदुसरा, सिंदफणा,मनकर्णिका,या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर अद्यापही पावसाचा जोर कमी झालेला नाही, अतिवृष्टीने अगोदरच खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यातच सलग 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातातुन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उडीद, सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर या पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. यातच नदीकाठ, ओढ्याकाठीची जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे.




Updated : 8 Sep 2021 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top