Home > News Update > Elon Musk : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचं मोठं योगदान !

Elon Musk : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचं मोठं योगदान !

Elon Musk : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचं मोठं योगदान !
X

सध्या Social Media सोशल मीडियावर Nikhil Kamath निखिल कामथ आणि एलॉन मस्क Elon Musk यांची चर्चा सुरु आहे. झिरोधा Zerodha चे सह- संस्थापक निखिल कामथ यांनी People by WTF podcast पॉडकास्टमध्ये Tesla टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांच्याशी बातचीत केली आहे. यावेळी मस्क यांनी अमेरिकेचे व्यापार धोरण US trade policy, अर्थव्यवस्था, टॅरिफ,H-1B visa system H-1B वीजा सिस्टम चा दुरुपयोग, कामाचे भविष्य, AI and robotics एआय-रोबोटिक्सची प्रगती, भारतीयांमुळे अमेरिकाची अर्थव्यवस्था कशी वाढली ? भविष्य, तसेच खाजगी आयुष्य अशा विविध विषयांवर चर्चा केली. हा पॉडकास्ट १ तास ५४ मिनिटांचा आहे.

Tariffs टॅरिफबद्दल आपली स्पष्ट भूमिका मस्क सांगतात की, टॅरिफमुळे देशाच्या आर्थिक वाढीला अनेक अडथळे निर्माण होतात. मुक्त व्यापार अधिक कार्यक्षम आणि रोजच्या जीवनाशी समांतर आहे. जर वैयक्तिक पातळीवर आणि इतर सर्वांमध्ये टॅरिफ लागू झाले तर जीवन किती कठीण होईल. शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये जर टॅरिफ लागू केलं तर अर्थव्यवस्था कोलमडेल त्याचनुसार देशांमध्येही हेच होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मी खूप सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना टॅरिफ लागू करायच होतं. त्यामुळे मी अयशस्वी झालो. मस्क यांच्या या भूमिकेमुळे त्यांची अंतर्दृष्टी अर्थव्यवस्थेवरील संरक्षणवादी धोरणांच्या परिणामांबद्दलची व्यापक चिंता दाखवते. Economic growth

दरम्यान भविष्याबाबत एआय आणि रोबोटिक्समधील प्रगती अनेकांसाठी काम आणि पैसा पर्यायी बनवू शकते. येणाऱ्या १० ते २० वर्षात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्याला काम करणं हे त्याच्या इच्छेवर अवलंबून असेल. तर एच-१बी व्हिसा Program पूर्णपणे बंद करण्याला समर्थन नसून त्यात सुधारणांची आवश्यकता आहे. मान्य आहे की काही आउटसोर्सिंग कंपन्यांनी या प्रणालीचा गैरवापर केला आहे, ज्यामुळे मूळ हेतू कमकुवत होतो. Skilled immigration कुशल स्थलांतरितांना अमेरिकन अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी काही मार्ग राखणे गरजेच आहे. अशा या बंदी मुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल त्यात सुधारणांची गरज आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत, टेक इंडस्ट्रीला मोठं करण्यात भारतीयांचा खूप मोलाचा वाटा आहे. मायक्रोसॉफ्ट चे सत्य नडेला आणि गूगल चे सुंदर पिचाई यांची नावं घेत अनेक भारतीय वंशीय लोकांनी अमेरिकाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. Tech industry contributions

Updated : 1 Dec 2025 8:55 AM IST
Next Story
Share it
Top