Home > News Update > आता तरी नीट वागा : एडीटर गिल्डनं `रिपब्लिक`ला सुनावलं

आता तरी नीट वागा : एडीटर गिल्डनं `रिपब्लिक`ला सुनावलं

भर लाईव्ह कार्यक्रमात एडीटर गिल्डच्या राजीनामा देणाऱ्या अर्नब गोस्वामीच्या रिपब्लिक वाहीनीला आता तरी नीट वागा, असं सुनावत `एडीटर गिल्डनं` मुंबई पोलिसांनी रिपब्लीकच्या पत्रकारांचा विनाकारण छळ करु नये, असं म्हटलं आहे.

आता तरी नीट वागा : एडीटर गिल्डनं `रिपब्लिक`ला सुनावलं
X

अतातायी पत्रकारीता करणाऱ्या रिपब्लिक वाहीनीची सध्या पोलिस यंत्रणेने चोहोबाजूनं नाकेबंदी केली असताना एडीटर गिल्डनं हस्तक्षेप करत मुंबई पोलिसांनी रिपब्लीकच्या पत्रकारांना विनाकारण छळू नये असं म्हटलं आहे. याचबरोबरच रिपब्लीक वाहीनीनं जबाबदारीनं वागावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांना सोमवारी एडीटर्स गिल्ड ऑफ इंडियाने पाठिंबा दर्शविला. वाहिनीने जबाबदारीने वागावे व "पत्रकारांच्या सुरक्षेसाठी" तडजोड करू नये, असे आवाहन केले आहे. रिपब्लिक टीव्हीवर टिआरपी घोटाळा प्रकरणी चौकशी केली जात आहे.गिल्ड़च्या वतीने प्रसिध्द केलेल्या निवेदनात पोलिसांच्या तपासावर प्रभाव पाडण्याची इच्छा नसली, तर पत्रकारांना होणारा त्रास त्वरित थांबवावा अशी अपेक्षा व्य़क्त केली आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या वाहिनीचे मालक शिरीष शेट्टी आणि नारायण शर्मा यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने म्हटले आहे की, वाहिनीने जबाबदारीने वागावे आणि "पत्रकारांच्या सुरक्षेबाबत तडजोड केली पाहिजे तसेच माध्यमांच्या सामूहिक विश्वासार्हता जपली पाहीजे". त्यात असेही निदर्शनास आणून दिले आहे की अभिव्यक्तीचा अर्थ द्वेषयुक्त भाषणाला प्रोत्साहन देण्यासाठीचा परवाना नाही.

"टीआरपीच्या घोटाळ्याबरोबरोबरच अभिनेता सुशांतसिंहच्या दुर्दैवी निधनानंतर रिपब्लिक टीव्हीनं ज्या पध्दतीनं वृत्तांकन केलं ते चिंताजनक होतं. "मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या छळाबद्दल चॅनेलच्या वकीलाकडे विचारणा केली आहे." "हायकोर्टाने असा प्रश्न विचारला ज्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे:' हा शोध पत्रकारितेचा भाग आहे का? कोणास अटक करावी, याविषयी जनतेचे मत जनतेला विचारुन सांगायचे. तसेच शोध पत्रकारितेच्या नावाखाली वाहिनी पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करीत आहे का? असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला होता.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने हंस रिसर्च ग्रुपमार्फत काही दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे बनावट टीआरपी रॅकेट उघडकीस आणले. यापूर्वी रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि वरिष्ठ कार्यकारी संपादक अभिषेक कपूर या प्रकरणातील जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हजर झाले होते.रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी ११ ऑक्टोबरला मुंबई पोलिसांकडे चौकशीसाठी हजर झाले होते.

टीव्ही चॅनेलचे मुख्य वित्तीय अधिकारी शिवा सुब्रमण्यम सुंदरम पोलिसांसमोर हजर होते.रिपब्लिक टीव्हीने वारंवार दावा केला आहे की टीआरपी घोटाळ्यातील मुख्य संपादकांना पाठविलेले समन्स चुकीचे आहे. होते. पोलिस प्रेसविरोधात अजेंडा राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'रिपब्लिक' वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या वृत्तात पोलीस दलात दोन गट पडले असून एक गट आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात आहे. हा गट बंड पुकारण्याच्या पवित्र्यात आहे, असा दावा केला होता. हे दावे निराधार असून त्याद्वारे पोलीस दलात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न 'रिपब्लिक' वृत्तवाहिनीने केला. पोलीस दलाची, पोलीस आयुक्तांची प्रतिमा मलीन केली, असा आरोप करत मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेतील उपनिरीक्षकाने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टिआरपी घोटाळा प्रकरणी आतापर्यंत नऊजणांना अटक करण्यात आलं आहे.

Updated : 26 Oct 2020 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top