Home > News Update > Hasan Mushrif यांच्या घरातून ED ला काय मिळालं?

Hasan Mushrif यांच्या घरातून ED ला काय मिळालं?

Hasan Mushrif यांच्या घरातून ED ला काय मिळालं?
X

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडीने (Enforcement Directorate - ED ) छापेमारी केली आहे. कागल व पुण्यातील त्यांच्या घरी ईडीने छापे टाकले आहेत. मुश्रीफ यांच्या घरी ही चौकशी तब्ब्ल १२ तास सुरु होती. शिंदे सरकार (shinde fadnavis government) सत्तेत आल्यानंतर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांआधी किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ट्विटच्या माध्यमातून कारवाईचा इशारा दिला होता त्यानंतर आता ही मोठी कारवाई होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय (ED) छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल (Kagal-kolhapur) तसेच पुणे येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. सकाळी ७ वाजता ही छापेमारी सुरु झाली आणि त्यानंतर तब्ब्ल १२ तास ED चे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरात होते. संध्याकाळी ७ वाजता सर्व अधिकारी त्यांच्या घरातून बाहेर पडले. काही दिवसांआधी किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील (appasaheb nalawade sugar factory) १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता ही मोठी कारवाई झाली आहे. ईडीचे जवळपास २० अधिकारी काल सकाळी सहाच्या सुमारास हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले.

ही धाड राजकीय हेतून..

ही धाड राजकीय हेतून झाली असून आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केले आहे. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आम्ही उत्तरे दिली असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी घरासमोर जे लोक उभे होते त्यांचे देखील आभार मानले.

30-35 वर्षाचे माझे जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे

माझ्या घरावर माझ्या नातेवाईकांच्या घरावर त्यानंतर माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापेमारी सुरू आहे मी काही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे सर्व माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी शांतता ठेवावी. या ED च्या कारवाई नंतर कागल बंद ठेवण्याची गावकर्यांनी ठरवलं होतं ही बातमी लिलतच मुश्रीफ यांनी, बंद ठेवण्याची घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी त्या सहकारी अधिकाऱ्यांना आपण संपूर्णपणे सहकार्य करावं एवढी विनंती करतो कुठलाही दगा धोका किंवा कायद्याचं उल्लंघन माझ्यासाठी आपण करू नये. यापूर्वीही अश्या प्रकारची धाड पडली होती. सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतली होती. पुन्हा कशासाठी छापा घातला आहे मला माहिती नाही. गेल्या 30-35 वर्षाचे माझे जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे आणि त्यामुळे दोन वर्षांमध्ये सुद्धा जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नाही.

काय आहे प्रकरण? मुश्रीफ आणि त्यांचा जावई यांनी मिळून हा १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप...

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला. तेव्हा तो ज्या कंपनीला विकण्यात आला ती बिस्क इंडिया (brisk india pvt ltd) ही कंपनी आहे. या कंपनीचा प्रमुख मालक हे मतीन मंगोली (Matin Mangol) हे आहेत. ते हसन मुश्रीफ यांचे जावई आहेत. या कंपनीतही कोलकाता (Kolkata) येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर आहे.

इतकाच नाही तर बिस्क इंडिया कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांना ती कंपनी दिली यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने (KDCC Bank) योग्य लिलाव केला नसल्याचा सुद्धा आरोप आहे. मुश्रीफ आणि त्यांचा जावई यांनी मिळून हा १०० कोटींचा घोटाळा आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता..

Updated : 12 Jan 2023 3:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top