Home > News Update > डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर, अफवा पसरवू किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, कुटुंबियांकडून विनंती निवेदन

डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर, अफवा पसरवू किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, कुटुंबियांकडून विनंती निवेदन

डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर, अफवा पसरवू किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, कुटुंबियांकडून विनंती निवेदन
X

Health Update : डॉ. बाबा आढाव Dr. Baba Adhav यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरु असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती काळजी करण्यासारखी परंतु स्थिर असल्याचं म्हटलं आहे. यावर डॉ. बाबा आढाव यांच्या कुटुंबियांकडून प्रकृती विषयी निवेदन करण्यात आलं आहे. की, आमचे वडील आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक ते उपचार चालू आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची Critical प्रकृती गंभीर आहे. त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले आहे. आज आत्ता प्रकृती काळजी करण्यासारखी पण स्थिर आहे.

सर्वांना विनंती की Rumors अफवा पसरवू नयेत किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितींवरच विश्वास ठेवावा. डॉ. बाबा आढाव यांच्या प्रकृतीविषयी घडामोडी योग्य वेळी कळविण्यात येतील. असं असीम व अंबर आढाव यांनी विनंती निवदेन केलं आहे.

वरील बातमीची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांच्याकडून आलेली आहे.

Updated : 6 Dec 2025 10:16 AM IST
Next Story
Share it
Top