Home > News Update > Washim : निष्ठावंताची उमेदवारी कापणाऱ्यांना 'Thank you', BJP च्या इच्छुक उमेदवाराने लावले बॅनर

Washim : निष्ठावंताची उमेदवारी कापणाऱ्यांना 'Thank you', BJP च्या इच्छुक उमेदवाराने लावले बॅनर

Washim : निष्ठावंताची उमेदवारी कापणाऱ्यांना Thank you, BJP च्या इच्छुक उमेदवाराने लावले बॅनर
X

Washim वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी Election उभे असलेल्या एका इच्छुक Candidate उमेदवाराला पक्षाने BJP उमेदवारी न दिल्याने नाराज कार्यकर्त्याने चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद माननारे बॅनर झळकावले आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी उभे असलेल्या एका इच्छुक उमेदवाराला पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज कार्यकर्त्याने चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद माननारे बॅनर झळकावले आहे. सध्या या बॅनर्सची वाशिम शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

म्हणून शहरभर लावले बॅनर्स

वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भाजपच्या अभियंता सेलचे विभागीय सह संयोजक Dhananjay Ghuge धनंजय घुगे Candidate Selection यांच्या ऐवजी दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. याच नाराजी मधून घुगे यांनी चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद माननारे बॅनर फ्लेक्स झळकवलेय. सोबतच पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी दिल्याचा मजकूरही फ्लेक्स बॅनरवर लिहलाय. या संदर्भात त्यांना विचारलं असता माझी उमेदवारी कापल्यानंतर मी पक्ष सोडेल किंवा पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचे कामं करेल, अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी आणि मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, हे सांगण्यासाठी मी बॅनर लावलेत, असं त्यांनी सांगितलं. Election Campaign

वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिकासह एका नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस होता. वाशिम नगरपालिका सदस्य पदासाठी एकूण 222 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 50 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता सदस्य पदासाठी 172 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, वाशिम नगर परिषद अध्यक्षपदासाठी 17 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 3 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदासाठीच्या रिंगणात 14 उमेदवार उरले आहेत.

Updated : 22 Nov 2025 12:18 PM IST
Next Story
Share it
Top