Home > News Update > DDLJ 30 Years Celebration : लंडनमध्ये शाहरूख-काजोलचा Bronze statue

DDLJ 30 Years Celebration : लंडनमध्ये शाहरूख-काजोलचा Bronze statue

DDLJ चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण, लंडनमध्ये राज-सिमरन चा पुतळा, बडे बडे देशों में, ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं, सेनोरिटा!- शाहरूख खान

DDLJ 30 Years Celebration : लंडनमध्ये शाहरूख-काजोलचा Bronze statue
X

गेल्या ३० वर्षांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ). या चित्रपटाचा मोह फक्त भारतात नसून जगभरात आहे. आजही हा चित्रपट थिएटरमध्ये सुरु आहे. या चित्रपटला ३० वर्ष पूर्ण झाले असून लंडनच्या लेस्टर स्क्वेअरवर राज आणि सिमरनच्या कांस्य पुतळ्याचे (स्टॅच्यू) अनावरण बॉलिवूड किंग Shah Rukh Khanशाहरूख खान आणि अभिनेत्री Kajol काजोल यांनी केलं आहे. ऑक्टोबरमध्येच या आयकॉनिक चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने लंडनमधील आनंद सोहळ्यात शाहरूख खान आणि काजोल पोहचले. खरतर आजवरच्या इतिहासात कधीच भारतीय सिनेमासाठी असं झालं नाही. काजोल आणि शाहरूख चा हा पुतळा भारतीय सिनेमाची मान उंचवणारा आहे. DDLJ मधील शाहरूख- काजोलच्या पोज वर हा कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे. दरम्यान पुतळ्याच्या अनावरणानंतर शाहरूख आणि काजोलने पुन्हा एकदा तो क्षण रिक्रिएट करत त्या पोज मध्ये उभे राहून फोटो काढले. तिकडे पाऊस पडत असल्यामुळे शाहरूख फोटोत छत्री पकडली आहे.

शाहरूख -काजोल यांनी काय म्हटलं?

DDLJ हा सिनेमा मनापासून बनवलेला होता. आम्ही अशी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की, ज्यात प्रेम प्रत्येक दिवाळाला तोडून टाकू शकतो. आणि हेच कारण आहे की आज ३० वर्षांनंतरही लोकांचे या सिनेम्याला भरभरून प्रेम मिळत आहे. माझ्यासाठी हा फक्त सिनेमा नसून ती माझी ओळख असल्याचं शाहरूखने म्हटलं. तर काजोल भावनिक होऊन सांगते की हे अद्भूत आहे कारण इतक्या वर्षानंतरही या सिनेमाला इतकं प्रेम मिळतंय हे सर्व भारावून टाकणारं आहे. तसेच लंडनमध्ये असा पुतळा उभ राहणं आमच्यासाठी जुन्या आठवणी नव्यानं समोर येणं आहे असं म्हणत तिने आनंद व्यक्त केला.

याविषयी शाहरूख खान ने सोशल मीडियावर या सोहळ्याचा फोटो शेअर करत

बडे बडे देशों में, ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं, सेनोरिटा! असं म्हणत युकेतील नागरिकांचे आभार मानले आहे.

पाहा ही पोस्ट

खरंतर एखादा तुमचा अभिनय एका सिनेमापूर्ती मर्यादित राहतो. त्यानंतर काही दिवस, महिने लोक तुमचं कौतुकही करतात. पण DDLJ या सिनेमाचं यश किती मोठं आहे हे जेव्हा जनता तुम्हाला दाखवून देते तेव्हा कलाकार त्यांच्या कामापेक्षा जनतेचे ऋणी राहतात. यात काम केलेल्या लोकांचा, कलाकारांचा हा सिनेमा नसून तो जनतेचा झाला आहे. शाहरूख- काजोल या दोघांच्या अभिनयाची जादू अजूनही कायम आहे.

Updated : 5 Dec 2025 11:21 AM IST
Next Story
Share it
Top