Home > News Update > दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट? राज्य सरकार झालं सतर्क

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट? राज्य सरकार झालं सतर्क

जगात देशात आणि राज्यात हाहाकार माजवलेल्या कोरोना महामारीचा प्रादुर्भात सध्या महाराष्ट्रात कमी झाला असला तरी आगामी दिवाळी सण, हिवाळ्यामुळे राज्यातही दुसऱ्या कोरोना लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने तयारी आणि खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रात  दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट? राज्य सरकार झालं सतर्क
X

मुंबईः देशात सव्वालाख आणि राज्यात अर्धालाख नागरीकांच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढून बुधवारी पहिल्यांदाच ८ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहे. करोना रुग्णांच्या या आकडेवारीनुसार दिल्ली सरकारनं ही करोनाची दुसरी लाट असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीनंतर महाराष्ट्रातही करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश जारी करुन संभाव्य संकटाविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

सध्या दिल्लीत सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ व महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या होती. आता महाराष्ट्रात दिल्लीच्या तुलनेनं कमी रुग्णसंख्या कमी झाली आहे. मागील २४ तासांत भारतात ४७ हजार ९०५ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, ५५० करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९२. ८९ टक्के इतका झाला आहे. देशात कोरोना मृत्यूंची संख्या 1 लाख 28 हजारावर पोचली असताना राज्यातील 45 हजार 560 नागरीकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवाळीनंतर हिवाळ्याच्या थंडीत जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. करोनाची दुसरी लाट राज्यात येऊ नये म्हणून राज्य सरकारकडून आतापासून ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य प्रशासनानं सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच, करोना उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. कोरोना रुग्णालय, कोविड सेंटर आणि कोरोना तपासण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुग्णालयास्तरावर इन्स्टिट्युशनल डेथ ऑडीट कमिटी स्थापन करण्याचे आदेशही सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत.

आगामी दिवाळी सण, हिवाळा यामुळेच कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळं राज्य सरकारकडून दिवाळी फटाके न फोडण्याचे आवाहन केले जात आहे. प्रदुषणामुळं करोनाचा विषाणू अधिक संसर्ग पसरवण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे. राज्यातील कोरोनावरील उपचाराच्या केसेस कमी झाल्या आहेत. सध्या राज्यात फक्त ९२ हजार रुग्ण उपचाराखाली असून रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संख्या वाढलीच तर त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. खाटांचे नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यासाठी जिल्हा टास्क फोर्स कार्यान्वीत करण्याचे आदेश देण्यात आले आहे.






Updated : 12 Nov 2020 9:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top