Home > News Update > काँग्रेसने 'बिग ब्रदर'च्या भूमिकेतून बाहेर यावं - सुजात आंबेडकर

काँग्रेसने 'बिग ब्रदर'च्या भूमिकेतून बाहेर यावं - सुजात आंबेडकर

काँग्रेसने बिग ब्रदरच्या भूमिकेतून बाहेर यावं - सुजात आंबेडकर
X

तुम्ही आता 'बिग' राहिले नाही असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत युतीचा सल्ला दिला आहे. नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. यामध्ये एनडीएचा विजय झाला असून काँग्रेस, आरजेडीला पराभूत स्विकारावाला लागला. या निवडणुकीत कॉंग्रेसने काय चूक केली यावर हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसच्या प्रस्थापित, सरंजामी नेत्यांविषयी भाष्य केलंय.

ते म्हणतात की,

आज बिहार निवडणुकीचा निकाल आला. त्यात भाजप, ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या महागठबंधनने विजय मिळवला. या बिहार निवडणुकीत काँग्रेसने एक घोडचूक केली ती म्हणजे, काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसतांना, त्यांचे तिथे नेतृत्व नसतांना आरजेडीशी वाद घालून त्यांनी जास्तीच्या जागा घेतल्या आणि त्या जागांवर काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेसला फटका बसला. काँग्रेसने 'बिग ब्रदर'च्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला 'ब्रदर' मानू, तुमच्याशी युती सुद्धा करू पण, तुम्ही 'बिग' राहिलेले नाहीत, हे काँग्रेसने समजून घ्यावे. जिथे वंचित बहुज आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, जिथे सन्मानपूर्वक कार्यकर्त्यांना जागा मिळतील. तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल. प्रस्थापित नेत्यांना आमचं एक सांगणे आहे की, तुम्ही कधी शहाणे होणार? काँग्रेसच्या स्थानिक लीडरशिपने शहाणपण दाखवत स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हाच शहाणपणा २०१९, २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांनी दाखवला असता, तर त्यांचा सुपडा साफ झाला नसता

https://x.com/sujat_ambedkar/status/1989392442421121151?s=48&t=2Xznuip1KV1MMpo5k2O5dg

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राज्यभरात ठिकठिकाणी सभा घेत आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक आणि आरक्षणवादी जनतेच्या मुद्द्यांसाठी लढण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांनी सत्तेत जाण्याच्या निवडणुका आहेत. आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा आले किंवा सोबत नाही आले, तरीही आम्ही लढत राहू.

नांदेडप्रमाणेच इतर ठिकाणी युती झाली तर ती सन्मानपूर्वक, स्वाभिमानाने, ५०-५० चा फॉर्म्युला स्वीकारून युती होईल. जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल.

आम्ही हाती घेतलेले मुद्दे न्याय मिळेपर्यंत लढत राहतो. देशातील आरएसएस विरुद्धचा पहिला मोर्चा, कोथरूड दलित मुलींना मारहाण प्रकरण, किंवा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टात जाऊन आरोपी पोलिसांवर गुन्हा नोंदवण्याचा विषय असो, आम्ही शेवटपर्यंत लढत राहिलो. आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, हे आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या सभांना उसळणाऱ्या स्वाभिमानी जनतेच्या प्रतिसादातून दिसत आहे. असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Updated : 15 Nov 2025 11:39 AM IST
Next Story
Share it
Top