Home > News Update > बर्ड फ्लूची भीती घालवण्यासाठी आयोजित चिकन-अंडी महोत्सवात खवय्यांनी मारला चांगलाच ताव...

बर्ड फ्लूची भीती घालवण्यासाठी आयोजित चिकन-अंडी महोत्सवात खवय्यांनी मारला चांगलाच ताव...

खा चिकन- अंडी बिनधास्त..!

बर्ड फ्लूची भीती घालवण्यासाठी आयोजित चिकन-अंडी महोत्सवात खवय्यांनी मारला चांगलाच ताव...
X


लोकांमधील बर्डफ्लू बाबत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी चिकन आणि अंडी महोत्सवाचं आयोजन महाराष्ट्र पशुविज्ञान, मत्स्य विद्यापीठात करण्यात आलं होतं. बर्डफ्लू मुळे आजपर्यंत संपूर्ण देशात एकाही माणसाची जीवहानी झालेली नाही. त्यामुळे सांगितलेले खबरदारी घेत अंडी, चिकन खा असे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितलं.

कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक राज्यांत बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. यामुळे आता नवे संकट उभे पुढे ठाकले आहे. पंजाब, राजस्थान, झारखंड पाठोपाठात महाराष्ट्रात देखील बर्डफ्लूमुळे हजारो पक्षी मारण्यातही आले. एकिकडे पक्ष्यांमध्ये अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या या संसर्गाची दहशत असतानाच दुसकरीकडे चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनीही आता या गोष्टींकडे भीतीपोटी पाठ फिरवली आहे.

लोकांमधील हाच संभ्रम दूर करण्यासाठी नागपुरात एक अनोखी शक्कल लढवण्यात आली. महाराष्ट्र पशुविज्ञान, मत्स्य विद्यापीठात यांनी चिकन आणि अंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थित हा महोत्सव पार पडला. यावेळी बर्ड फ्लूबाबत चुकीची माहिती पसरवली जात असून २००६ साली पहिल्यांदा बोर्डफ्लू महाराष्ट्रात आला तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण देशात यामुळे एकाही माणसाची जीवहानी झालेली नाही. माणसाला बर्ड फ्लू झालेला दाखवल्यास रोख पारितोषिक देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार मंत्री सुनील केदार यांनी केला.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून असते. पण या बोर्डफ्लूने अनेकांचे कबरडं मोडलं आहे. अंडी, चिकन खाल्याने बर्डफ्लू होतो असा प्रसार झाल्याने हा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली आहे. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात पण अंडी व मांस सेवन केल्यास कोरोना होतो असा गैरसमज पसरला होता. त्यावेळी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. बर्ड फ्लूच्या बाबतीत देखील आज असचं चित्र आहे. चिकन आणि अंडी खाण्याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. काहींनी तर या गोष्टी खाणं दूर त्यांच्याकडे पाहणंही सध्या बंदच केलं आहे. अंडी, चिकन खाताना ते योग्य शिजवून खावे. याबाबत चुकीची माहिती पसरवण्याऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असा इशारा केदार यांनी यावेळी दिला.

दरम्यान, अंडी आणि चिकन महोत्सवात त्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थांवर खवय्यांनी चांगलाच ताव मारला. पशु संवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही यानिमित्तानं रविवारचा पुरेपूर आस्वाद घेतला. खुद्द पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी स्वतः मात्र चिकन खाल्ले नाही. ते स्वतः शाकाहारी असल्यामुळे चिकन खात नसल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

Updated : 24 Jan 2021 12:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top