Home > Max Political > BJP Congress Alliance in Ambernath : काँग्रेसच्या १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई, कार्यकारिणीही केली बरखास्त

BJP Congress Alliance in Ambernath : काँग्रेसच्या १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई, कार्यकारिणीही केली बरखास्त

BJP Congress Alliance in Ambernath : काँग्रेसच्या १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई, कार्यकारिणीही केली बरखास्त
X

राज्यात निवडणुकीच्या तोंडावर युती-आघाड्यांचं राजकारण जोरदार सुरु आहे. स्थानिक पातळीवर होणाऱ्या युती- आघाड्यांवर वरिष्ठ पातळीवरून पक्षशिस्तभंगाची कारवाई होत असल्याचही पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस यांच्यातील अनपेक्षित युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता काँग्रेस पक्षाने आपल्या १२ नगरसेवकांवर कठोर कारवाई केली आहे.

अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी केली आहे. भाजप काँग्रेसच्या युतीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी आहे. काँग्रेस-भाजपच्या युतीची देशभरात चर्चा होत असताना दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेऊन ही युती मान्य नसल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाने सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबनाची कारवाई केली असून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीची संपूर्ण कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या अधिकृत पत्रकात काय म्हटलं आहे ?




"आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे", अशा शब्दात काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ही बाब लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुद्धा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. प्रदेश काँग्रेसकडून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रात ही कारवाई जाहीर करण्यात आली आहे.

Updated : 7 Jan 2026 4:06 PM IST
Next Story
Share it
Top