Home > News Update > बीडमध्ये दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

बीडमध्ये दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात बीड पोलिसांच्या प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे..

बीडमध्ये  दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
X

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. यात जिल्ह्यातील इतर ठिकाणांहून अनेक दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांनी त्यांच्या टिमला सतर्क केले होते. या संदर्भात मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने बीडसह राज्यभरात दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले असून यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या आरोपींकडून तब्बल २२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमचे अभिनंदन केले.

बीड जिल्ह्यातील शिवाजी नगर, बीड ग्रामिण पोलीस ठाणे, दिंद्रुड, परळी ग्रामिण, पाटोदा, गेवराई, शिवाजी नगर, पुणे शहर, भोसरी पुणे, चाकण पुणे, लोणीकंद पुणे, कोरेगांव पुणे, विजापुर नाका सोलापुर, गोंदी जालना, जामखेड, अमदनगर, जवाहरनगर छ.संभाजीनगर, बीलगी बागलकोट (कर्नाटक राज्य) येथील पोलीस ठाण्यात नोंद असणाऱ्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या माहिती नुसार बीड तालुक्यातील बाभुळखुंटा येथील एक जण चोरीची दुचाकी वापरत असून तोच चोरी करत असल्याची माहिती खात्रीलायक माहिती मिळाली होती. प्रारंभ याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने बाभुळखुंटा याठिकाणी जाऊन संबंधित चोरट्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सर्व गुन्ह्याची कबूली दिली. यात गोकुळदास मगर बोरगे वय २३, धर्मराज कल्याण बोरगे वय २९ दोघेही राहणार बाभुळखुंटा, यांच्यासह दोन अल्पवयीन मुले असे हे चौघे दुचाकीची चोरी करुन विकत होते. या आरोपींकडून तब्बल २२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष सांबळे यांच्या टिममधील पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशीराम जगताप, नसिर शेख, विलास ठोंबरे, अशोक दुबाळे, राहूल शिंदे, भागवत शेलार, विकी सुरवसे, सतिष कातखडे, बाप्पासाहेब घोडके, गणेश मराडे यांनी केली. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सर्वच टिमचे अभिनंदन केले आहे.

Updated : 1 Aug 2023 4:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top