Home > News Update > Bhupesh Baghel यांचा धीरेंद्र शास्त्रीवर कडाडून हल्ला, "BJPचे एजंट म्हणून काम करतात, छत्तीसगडच्या महात्म्यांशी शास्त्रार्थ करून दाखवावे!"

Bhupesh Baghel यांचा धीरेंद्र शास्त्रीवर कडाडून हल्ला, "BJPचे एजंट म्हणून काम करतात, छत्तीसगडच्या महात्म्यांशी शास्त्रार्थ करून दाखवावे!"

"कल का बच्चा" असलेले शास्त्री आम्हाला सनातन धर्म शिकवू शकत नाहीत- भूपेश बघेल

Bhupesh Baghel यांचा धीरेंद्र शास्त्रीवर कडाडून हल्ला, BJPचे एजंट म्हणून काम करतात, छत्तीसगडच्या महात्म्यांशी शास्त्रार्थ करून दाखवावे!
X

Chhattisgarh छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते Bhupesh Baghel भूपेश बघेल यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. भिलाईमध्ये हनुमंत कथा सांगत असलेल्या धीरेंद्र शास्त्रींना बघेल यांनी "भाजपाचे एजंट" म्हटले असून, त्यांचा धंदाच हाच असल्याचा आरोप केला आहे.

बघेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की,

"धीरेन्द्र शास्त्री भाजपा के एजंट के रूप में काम करते हैं, यही उनका धंधा है. मैं उन्हें चुनौती देता हूं, हमारे छत्तीसगढ़ में बड़े महापुरुष हैं, शास्त्री जी हमारे मठ-मंदिरों में बैठे साधु-महात्माओं के साथ शास्त्रार्थ कर के दिखाएं."

यापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी बघेल यांना विदेशात जाण्याची सल्ला दिला होता, त्यावर बघेल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जेव्हा शास्त्रींचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते हनुमान चालीसा आणि बजरंग बाण वाचत आहेत. "कल का बच्चा" असलेले शास्त्री आम्हाला सनातन धर्म शिकवू शकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.


बघेल यांनी शास्त्रींवर छत्तीसगडमध्ये फक्त पैसा गोळा करण्यासाठी येण्याचा आरोपही केला. तसेच, दिव्य दरबारमध्ये लोक बरे होत असतील तर मेडिकल कॉलेज उघडण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला. छत्तीसगडमध्ये कबीर आणि गुरु घासीदास यांची वाणी गुंजते, येथे सनातन धर्म शिकवण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

धीरेंद्र शास्त्री सध्या भिलाईच्या जयंती स्टेडियममध्ये २५ ते २९ डिसेंबरपर्यंत हनुमंत कथा कार्यक्रम करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान झालेल्या या वादळी विधानांमुळे छत्तीसगडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शास्त्री यांनी यापूर्वी बघेल यांच्या अंधश्रद्धा पसरवण्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, भक्ती आणि राष्ट्रप्रेम अंधविश्वास वाटत असेल तर देश सोडावा.

आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Updated : 27 Dec 2025 8:38 AM IST
Next Story
Share it
Top