Home > News Update > मोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का, या बड्या नेत्याने केली घरवापसी

मोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का, या बड्या नेत्याने केली घरवापसी

मोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का, या बड्या नेत्याने केली घरवापसी
X

बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार गट व मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे बजरंग सोनवणे यांनी तुतारी हातात घेतली आहे. ते राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे, बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला आहे. ते आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय गणित कशी बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या विद्यमान पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसंग्राम चे पदाधिकारी करत होते. याविषयी बैठक देखील झाली होती. त्यानंतर त्यांची चर्चाही प्रसारमाध्यमावर झाली. आज पुणे येथे राष्ट्रवादीची मोठी बैठक होत असून या बैठकीत बीड जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या बैठकीत बीड जिल्ह्याची लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार हे निश्चित होण्याची चिन्हे आहेत. बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षिरसागर हे देखील पुण्यात तळ ठोकून आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला बजरंग सोनवणे यांनी सोडचिट्टी दिल्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे

Updated : 20 March 2024 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top