Home > News Update > आधी आमदार निवडून आणा मग बोला, अरविंद सावंत यांचा रामदास आठवले यांना टोला

आधी आमदार निवडून आणा मग बोला, अरविंद सावंत यांचा रामदास आठवले यांना टोला

आधी आमदार निवडून आणा मग बोला, अरविंद सावंत यांचा रामदास आठवले यांना टोला
X

उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत यावं आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊ, अशी ऑफर रामदास आठवले यांनी दिली होती. त्यावरून अरविंद सावंत यांनी रामदास आठवले यांना टोला लगावला आहे.

विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया अघाडीची स्थापना केली आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊ, अशी ऑफर दिली होती. त्याला खासदार अरविंद सावंत यांनी टोला लगावला आहे.

विरोधकांनी एकत्र यावे, त्याला कोणाचा विरोध नाही. लोकशाहीत जनतेचा कौल मान्य आहे. मोदी सरकारने देशात विकासात्मक काम केले आहे. लहान पक्षांनाही न्याय देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप लहान पक्षाला संपविते, असा विरोधकांकडून होणारा आरोप चुकीचा आहे, हे स्पष्ट करतानाच अरविंद सावंत यांनी नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाच्या दिलेल्या ऑफरला काहीही अर्थ नाही. उलट उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत यावं त्यांनाही उपमुख्यमंत्री पद देऊ, असं रामदास आठवले म्हणाले होते. त्यावर उत्तर देतांना 'रामदास आठवले यांनी आधी आपले आमदार निवडून आणावेत आणि मग बोलावं,' असं म्हणत अरविंद सावंत यांनी रामदास आठवले यांना टोला लगावला.

Updated : 23 Aug 2023 4:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top