Ajit Pawar Tributes : अजितदादांना अखेरचा निरोप
X
अजितदादा अमर रहे... एकच वादा अजित दादा अशा भावनात्मक घोषणांनी आज बारामतीचा आवाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहचला आहे. सर्वसामान्य जनता, कार्यकर्त्यांसोबत अनेक राजकीय नेत्यांचा टाहो पाहायला मिळत आहे. २८ जानेवारीची सुरुवात महाराष्ट्रसाठी काळा दिवस म्हणून झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे महाराष्ट्राला मोठा धक्का लागला. आज बारामती विद्या प्रतिष्ठाण प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार होणार आहे. अजितदादांच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीत लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय उसळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मान्यवर नेते मंडळींची ही उपस्थिती पाहायला मिळत आहे.
अजित पवार हे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. सत्ता हवी ती फक्त जनतेच्या कामासाठी आणि त्यापद्धतीने त्यांचं कार्यही होतं. जमिनीशी नाळ जोडलेला नेता सध्याच्या राजकारणात होणे नाही अशी भावना समाजमाध्यमांवर अनेकांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदाचे मानकरी हे नेहमीचं अजित पवार राहिले आहे. प्रशासनावर पकड, कामातली शिस्त त्यांचा रोखठोक स्वभाव राज्याच्या राजकारणाला नेहमीच उंच पातळीवर घेऊन जाणारा होता. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे. सत्ताधारी सोबत विरोधकांचेही डोळेे आज पाणावले आहेत. आपला मोठा दादा गेल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.






