Home > News Update > अहमदनगर-आष्टी रेल्वे उद्घाटनावर रेल्वे संघर्ष कृती समितीचा बहिष्कार

अहमदनगर-आष्टी रेल्वे उद्घाटनावर रेल्वे संघर्ष कृती समितीचा बहिष्कार

अहमदनगर-आष्टी रेल्वे उद्घाटनावर रेल्वे संघर्ष कृती समितीचा बहिष्कार
X

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील पहिल्या टप्प्यातील अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्गाचे करण्यात येणार आहे. मात्र या उद्घाटच्या पुर्वसंधेला रेल्वे संघर्ष कृती समितीने बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.

अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग व्हावा यासाठी अनेक संघटनांकडून सातत्याने आंदोलन केले जात होते. पण या रेल्वेमार्गासाठी आंदोलन आणि पाठपुरावा करणाऱ्या एकाही संघटनेला उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे या संघटनांनी बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.

अहमदनगर ते परळी रेल्वे मार्ग पुर्ण व्हावा, यासाठी अनेक संघटना आंदोलन करत होत्या. त्यापैकी या रेल्वेमार्गासाठी रेल्वे संघर्ष कृती समिती, युक्रांद संघटना, स्वातंत्र्य सैनिक संघटना, नागरी युवक संघटना यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते. परंतू त्यांनी सदरील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यापैकी एकाही संघटनेला निमंत्रण नसल्याने सदरील कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे माजी आमदार राजेंद्र जगता, माजी आमदार जनार्धन तुपे, सुशीला मोराळे यांनी कळविले आहे.

संघटनांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने गल्ली ते दिल्लीपर्यंत जावून आंदोलन केली. निवेदने देवून मागण्या केल्या. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांची केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक घेतली होती. त्यावेळेस रेल्वेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. तसेच तात्कालीन पालकमंत्री विमल मुंदडा, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेवून राज्यशासनामार्फत रेल्वेसाठी 50 टक्के निधी देण्यात यावा अशी मागणी केली होती.

रेल्वे आंदोलन उभा करण्यास अमोल गलधर यांचा देखील यामध्ये मोठा सहभाग होता. अशातच 2009 साली 155 रेल्वे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. ते गुन्हे 2019 साली मागे घेण्यात आले. इतके सारे प्रयत्न अहमदनगर ते बीड-परळी या मार्गावरुन रेल्वे यावी यासाठी बीडमधील रेल्वे संघर्ष कृती समिती, युक्रांद संघटना, स्वातंत्र्य सैनिक संघटना, नागरी युवक संघटना यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. त्यांना देखील 23 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार्‍या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण नाही. त्यामुळे या संघटनांनी बहिष्कार टाकल्याची माहिती दिली आहे.

तसेच बीड जिल्हा रेल्वे संघर्ष समिती तर्फे रेल्वे आंदोलकांचा मेळावा घेण्यात आला. रेल्वे मार्गाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी दिली.

Updated : 23 Sep 2022 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top