Home > News Update > आठवड्यानंतर सुएझ कालवा मोकळा : अडकलेलं जहाज मोकळं

आठवड्यानंतर सुएझ कालवा मोकळा : अडकलेलं जहाज मोकळं

मागच्या मंगळवारी जगप्रसिध्द सुवेझ कालव्यामधे अडकलेल्या सुवेझ कालव्याच्या मधोमध अडकलेलं एवर गिव्हन महाकाय जहाज आठवडाभराच्या प्रयत्नानंतर आज मोकळं करण्यात सुवेझ कॅनल प्राधिकरणाला यश आलं आहे.


मंगळवारी सुवेझच्या कालव्यातून जाताना नियंत्रण गमावल्याने ४०० मीटर लांब आणि ५९ मीटर रुंद आणी 200,000 टन वजन असणारे हे महाकाय एवर गिव्हन जहाज अडकले होते. मालवाहतूक करणाऱ्या जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टग बोट्स (जहाजांना धक्का देणाऱ्या शक्तिशाली जहाज) तैनात करण्यात आल्या होत्या.

जवळ पास ४०० मीटर लांबीचं जहाज आता सरळ करण्यात आलं असून यामुळे आता सुएझ कालव्यातील वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.ट्रगबोट्स आणि ड्रेजर्सच्या साहयाने या जहाजाला बाहेर काढण्यात आलं. इजिप्तच्या भागात असलेला सुएझ कालवा हा जागतिक व्यापारासाठी आत्यंतिक महत्वाचा मानला जातो.

सुवेझ कालवा युरोप आणि आशियाच्या सागरी मालवाहतुकीचा कणा समजला आतो. सुवेझ कालव्यामुळे आशिया आणि युरोप खंडातील जलवाहतूक सुसह्य आणि वेगवान झाली आहे.जगभरातील व्यापाराच्या 12 टक्के मालाची सुवेझ कालव्यातून केली जाते.

मंगळवारी (23 मार्च) चीनहून नेदरलॅंडला जाणारं मालवाहू जहाज सुवेझ कालव्यात अडकलं. हे जहाज बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण जहाज अडकल्याने जगभरातील व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला.सुवेझ कालवा बंद झाल्याने खनिज तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या होत्या.

भारतालाही या जहाज कोंडीचा मोठा फटका बसला असून महाराष्ट्रातून युरोपला पाठवला गेलेला जवळपास ₹400 कोटींचा कृषीमाल सुवेझ कॅनलच्या अलीकडे 1300 कंटेनर्समधे अडकून पडला होता. आता वाहतूक सुरळीत होणार असल्यानं त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गाचं होणारं नुसकान टाळलं जाईल असं सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

Updated : 29 March 2021 7:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top