Home > News Update > Global Indology Conclave : "अच्छे दिन" की शुरुवात हो रही है - शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

Global Indology Conclave : "अच्छे दिन" की शुरुवात हो रही है - शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

Global Indology Conclave : अच्छे दिन की शुरुवात हो रही है - शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
X

“अच्छे दिन आने की शुरुवात हो रहीं है” असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती Shankaracharya Avimukteshwaranand यांनी Global Indology Conclave ग्लोबल इंडोलॉजी कॉन्क्लेवमध्ये म्हटलं आहे.

Adani अदानी ग्रुपचे चेयरमन Guatam Adani गौतम अदानी यांनी ग्लोबल इंडोलॉजी कॉन्क्लेवचा एक व्हिडिओ (एक्स वर) सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://x.com/gautam_adani/status/1992472932321468516?s=48

या व्हिडिओमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणतात की, “ बऱ्याच वर्षांपूर्वी राजकीय क्षेत्रातून एक घोषणा आपल्या सगळ्यांसमोर आली होती. अच्छे दिन आनेवाले है, खूप लोक विचारतात की ते अच्छे दिन कधी येणार ? परंतु आज इथे बसून जितकं आमचं बोलणं झालं, जितकं मला समजलं त्यावरून आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे आणि असं होऊ शकत की हे माझं बोलणं नंतर लक्षात ठेवलं जाईल, की अच्छे दिन की शुरुवात हो रहीं है| कारण अच्छे दिन भारताचे कधी येणार जेव्हा भारताला भारत म्हटलं जाईल. या वक्तव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे.

"अच्छे दिन आऐंगे" ही घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी यांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान (during the 2014 general election campaign) दिली होती.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ही घोषणा प्रमुख नारा म्हणून वापरली होती, ज्याचा उद्देश जनतेला हे पटवून देणे होता की, जर भाजप सत्तेत आला तर भारताचे भविष्य उज्ज्वल होईल.

दरम्यान गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, अडाणी ग्लोबल इंडोलॉजी कॉन्क्लेव 2025 मध्ये जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती जी महाराजांचे स्वागत करणे आणि त्यांच्या दिव्य लोकांमध्ये आशीर्वाद प्राप्त करणे माझ्यासाठी अत्यंत सौभाग्य आणि सन्मानाचे आहे. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी म्हणाले, माझ्यासाठी इंडोलॉजीचा अर्थ दर्शन, कला, चिकित्सा, गणित, वास्तुकला, भाषा आणि शासनाचा अनुशासित अध्ययन आहे. इंडोलॉजी का अर्थ आहे की विचार संस्थांमध्ये कसे बदलणे.

Updated : 24 Nov 2025 10:52 AM IST
Next Story
Share it
Top