Home > News Update > पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यावर वार

पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यावर वार

पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यावर वार
X

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर ब्लेडने गळ्यावर वार करून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रेखा ज्ञानेश्वर गिरमे असं हल्ला झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव असून या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. रेखा गिरमे यांच्यावर ब्लेडने वार करून गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला आहे.

रेखा गिरमे या पहाटे पाचला मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असताना त्या मोबाईलवर भजन ऐकत होत्या, त्यामुळे त्यांना मागून कोणी येत आहे हे कळलंच नाही आणि त्या व्यक्तीने त्यांची मान पकडून मानेवर ब्लेडवर वार करून गळ्यातील सोन्याचे दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु रेखा गिरमे यांनी आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना एकत्र केले, दरम्यान संबंधित व्यक्तीने तेथून पळ काढला होता. या घटनेत रेखा गिरमे यांना सहा टाके पडले आहेत




दरम्यान याआधी रेखा गिरमे यांच्या घरात एक व्यक्ती संशयास्पद डोकावत असल्याचे घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. हा व्यक्ती आणि वार करणारा व्यक्त एकच असावा असा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

Updated : 24 Sep 2021 11:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top