Home > News Update > दूध भेसळ प्रकरणात राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

दूध भेसळ प्रकरणात राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

दूध भेसळ प्रकरणात राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल
X

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे पावडर आणि रसायनापासून भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीवर आष्टी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने छापा मारला आहे. आष्टी शहरातील संभाजी नगर भागातील एका डेअरीवर भेसळयुक्त दूध बनवण्यासाठी लागणारी पावडर आणि रसायनाचा मोठा साठा आष्टी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा गोरखधंदा राष्ट्रवादीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकचं खळबळ उडाली आहे.

या कारवाईत 132 पांढऱ्या गोण्या पावडर व पत्र्याचे 220 डब्बे रसायन असा 8 लाख 91 हजार 375 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान याप्रकरणी जगदंबा मिल्क ऍण्ड मिल्कस चे मालक तथा राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष सतीश नागनाथ शिंदे यांच्यासह अन्य एकावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. दरम्यान सतीश शिंदे हे फरार झाले असून नंदू मेमाणे नामक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सतीश शिंदे हे पावडर आणि रसायनापासून दूध बनवून पुणे येथे विकत असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सह आयुक्त इम्रान हाश्मी यांनी फोनवरून दिली आहे.

Updated : 2023-03-17T20:21:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top