Home > News Update > #कोरोनाचा_कहर- अमेरिकेत एकाच दिवसात ५३ हजार रुग्ण

#कोरोनाचा_कहर- अमेरिकेत एकाच दिवसात ५३ हजार रुग्ण

#कोरोनाचा_कहर- अमेरिकेत एकाच दिवसात ५३ हजार रुग्ण
X

जगात कोरानाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याचे दिसते आहे. अमेरिकेमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये तर कोरोनाचे तब्बल 53 हजार नवीन रुग्ण अमेरिकेमध्ये आढळलेले आहेत. सर्वाधिक 10 हजार 119 रुग्ण हे फ्लोरीडामध्ये नोंदवले गेले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 27 लाखांच्यावर लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. तर आतापर्यंत एकूण 1 लाख 28 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावण्यासह सोशल डिस्टंसिंग आणि सुरक्षेच्या इतर उपायांचे पालन करावे असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा..

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाऊन एकदम शिथिल केलं तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असा इशारा तज्ञांनी दिला होता, पण हा इशारा गांभीर्याने घेतला गेलेला दिसत नाहीये.

Updated : 3 July 2020 1:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top