Home > News Update > Adani Scam ; ३२ हजार कोटींचा घोटाळा राहुल गांधींचा आरोप

Adani Scam ; ३२ हजार कोटींचा घोटाळा राहुल गांधींचा आरोप

खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. अदानींवर ३२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत चौकशीची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

Adani Scam ; ३२ हजार कोटींचा घोटाळा राहुल गांधींचा आरोप
X

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे स्पष्टीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच एका परदेशी वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी व्यापारी समूहाच्या प्रमुखावर ३२ हजार कोटी रुपयांच्या चोरीचा आरोप केला असल्याचं राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.

काय आहेत आरोप?

राहुल यांनी फायनान्शियल टाईम्स या वृत्तपत्राचा अहवाल दाखवत अदानी समूह चुकीची किंमत दाखवून जास्त पैसे वसूल करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, 'अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा खरेदी करतात आणि कोळसा भारतात पोहोचेपर्यंत त्याचे दर बदलतात. अदानींनी जनतेच्या खिशातून अंदाजे १२ हजार कोटी रुपये काढले आहेत. कोळशाचे दर चुकीचे दाखवून विजेचे दर वाढवले. या आधी ही राहुल गांधी यांनी अदानी समूहावर २० हजार कोटींच्या चोरीचा आरोप केला आहे.

I.N.D.I.A. आघाडीचे सरकार स्थापन झाले तर चौकशी करू ?

पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की सत्तेत आल्यावर गौतम अदानींची चौकशी 'नक्कीच पूर्ण करू. हे अदानी जी बद्दल नाही…. 32 हजार कोटींची कोणी चोरी केली त्याची चौकशी केली जाईल असं गांधी यांनी सांगितलं

अदानींना पंतप्रधान संरक्षण देतात ?

अदानींना पंतप्रधान संरक्षण देत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले, 'पंतप्रधान अदानीजींची चौकशी का करत नाहीत? हा मुद्दा आम्ही संसदेपासून जाहीर सभांपर्यंत मांडला. अदानीला सुरक्षा दिली जात आहे, ती फक्त एकच व्यक्ती देऊ शकते दुसरे कोणीही देऊ शकत नाही. मी पंतप्रधानांना खुलासा करण्याची मागणी करत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.Updated : 18 Oct 2023 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top