Home > मॅक्स व्हिडीओ > महावितरणच्या खाजगीकरणाविरोधात बीड(Beed)येथील वीज कर्मचाऱ्यांचा यल्गार

महावितरणच्या खाजगीकरणाविरोधात बीड(Beed)येथील वीज कर्मचाऱ्यांचा यल्गार

महावितरणच्या खाजगीकरणाविरोधात  बीड(Beed)येथील वीज कर्मचाऱ्यांचा यल्गार
X

आज बीड जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे सर्वच कर्मचारी वीजवितरण विभागाचे खाजगीकरण करू नये या मागणीसाठी संपावर गेलेले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. हा संप 72 तासाचा असल्याचे घोषित करण्यात आले आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांना बसणार आहे. त्याचबरोबर महावितरण व महापारेषण जर आदमीच्या घशात गेले तर अनेक सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. सरकारनं महावितरण कंपनीचे खाजगीकरण करू नये हि कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

बीड जिल्ह्यात एकूण सातशे वीज कर्मचारी आहेत त्यापैकी 650 कामगार या संपामध्ये सामील झालेले आहेत. आऊटसोर्सिंग सहित कर्मचारी संपावर आहेत. जवळपास परळी शहरातील 71% सब स्टेशन बंद झालेली आहे .माजलगाव तालुक्यातील जवळपास सर्वच सब स्टेशन बंद झालेली आहेत. देवळा तालुक्यातील 11 सब स्टेशन बंद झाले आहेत, बीड तालुक्यातील नऊ स्टेशन बंद झाले आहेत.

जोपर्यंत 72 तासाचा संप पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा कुठलाही कामगार कामावर रुजू होणार नाही असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दीला आहे.

खाजगीकरणामुळे काय होणार परिणाम?

शेतकऱ्याची सबसिडी होऊ शकते बंद.

शेतकऱ्याच्या संप्रेषण करण्याच्या नावाखाली 59 हजार कोटी रुपये देऊन सुद्धा कसल्याही प्रकारची सबसिडी या शासनाने दिली नाही.

जिल्ह्यातील छोट्या छोट्या उद्योगांना दिली जाणारी सबसिडी बंद होण्याची शक्यता.

जो नफ्याचा भाग आहे, ज्या ठिकाणी वीज कंपनीची संपूर्ण वसुली होते असा भाग सध्या खाजगी करण्यासाठी अदानीला देऊ इच्छित आहे या सर्वांच्या विरोधासाठी हा कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.


Updated : 4 Jan 2023 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top