Home > मॅक्स रिपोर्ट > ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे नुकसान झाले असून भविष्यातील पीढी बरबाद होईल असं शिक्षण तज्ञ सांगत असताना बीड जिल्ह्यातील उसतोडणी कामगारांच्या शिक्षणाचेही तीनतेरा वाजले असून ऊस तोडणी कामगारांची ऑनलाइन शिक्षण सोडून मोबाईल वर गेम खेळत असल्याची कबुली पालकांनी दिली आहे. या शैक्षणिक आणि सामाजिक समस्ये विषयीचा मॅक्स महाराष्ट्र खास रिपोर्ट...

ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
X

कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे नुकसान झाले असून भविष्यातील पीढी बरबाद होईल असं शिक्षण तज्ञ सांगत असताना बीड जिल्ह्यातील उसतोडणी कामगारांच्या शिक्षणाचेही तीनतेरा वाजले असून ऊस तोडणी कामगारांची ऑनलाइन शिक्षण सोडून मोबाईल वर गेम खेळत असल्याची कबुली पालकांनी दिली आहे. या शैक्षणिक आणि सामाजिक समस्ये विषयीचा मॅक्स महाराष्ट्र खास रिपोर्ट...

बीड जिल्हा म्हटलं की संपूर्ण राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे याच बीड जिल्ह्यातून जवळपास साडेपाच ते सहा लाख लोक ऊस तोडणीसाठी जातात याच ऊस तोडणीवर अनेक लोकांचा उदरनिर्वाह चालतो मात्र याच ऊस तोडी मुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात तर ही मुले न शकल्यामुळे त्यांचे जीवनही उध्वस्त होताना पाहायला मिळत आहे आई- वडील ऊस तोडायला गेले की त्याच्याबरोबर मुलांनाही जावं लागतं कारण घरची परिस्थितीही तशीच असते त्यामुळे अनेक मुलं शाळा सोडून ऊस तोडणीला जातात एकदा वय निघून गेलं की त्या मुलांना आपल्या वडिलांचा सारखाच ऊस तोडावा लागतो त्यामुळे शासनाने कोरोना काळात जरी शाळा बंद केल्या असल्या तरी पुन्हा एकदा शाळा सुरु कराव्यात व बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शाळा पूर्ववत कराव्यात अशीच मागणी या ऊस तोड कामगार यांनी केली आहे.

याविषयी बोलताना उसतोड कामगार विजया रमेश पवार म्हणाले, शासनाने विद्यार्थीच्या शाळा सुरू कराव्यात आम्ही ऊसतोड कामगार आहोत. आमच्या घरी कोणीही नसतं त्यामुळे मुलं आमच्या बरोबर आलेले आहेत शाळा सुरू असल्यावर आम्हाला मुलांना वस्तीगृहात टाकता येत आहे. आमचा मुलगा पाचवीला आहे शाळा बंद असल्यामुळे आमच्या बरोबर आलेला आहे. पाचवी चा मुलगा सहावी ला टाकला तर त्याला पाचवीचं काहीच येणार नाही. शाळा सुरू असल्यामुळे आमच्या बरोबर येत नाही. त्याचबरोबर मुलांना वसतीगृहा जेवण मिळत असते. शाळा सुरू असल्या मुलांना क्लास लावता येत आहे. शाळा बंद असल्यामुळे त्याला बाराखडी सुद्धा येत नाही. शाळा बंद असल्यामुळे मुलांची ABCD सुद्धा विसरून गेली आहे. त्याच्या लक्षात काहीच राहिले नाही. शाळा सुरू असल्यावर मुलांना गणित गुणाकार भागाकार सर्व काही येते. आता मुलांची अवस्था पुढचे पाठ मागचे सपाट अशी परिस्थिती झाली आहे.

आमचा मुलगा गेल्यावर्षी दहावीला होता. त्याला 89 टक्के पडले आहेत त्यांची परीक्षा झाली नाही. परीक्षा ऑफलाइन व्हायला पाहिजे होती. ऑनलाइन परीक्षा झाली त्यामुळे त्या टक्क्याचा काही फायदा नाही. तर ऑफलाईन परीक्षा झाली असती तर आम्हाला कळले असते की आमचा मुलगा किती हुशार आहे तो? त्यामुळे शासनाने शाळा सुरू कराव्यात. शाळा सुरू झाल्यावर क्लास लावता येतात शाळा रेग्युलर जर असल्या तर आमच्या मुलाला आता बारावीला मुलगा जाणार आहे त्याला साठ हजार रुपये फीस भरायची आहे. ऑफलाईन असल्यावर आमचा फायदा आहे. ऑनलाईन आमचा फायदा नाही ऑनलाईन असल्यावर आम्ही साठ हजार रुपये जरी भरले तरी आमचा त्याचा काय फायदा होणार नाही. दारूचे दुकान आपण चालू आहे मार्केट सगळं चालू आहे. कापड दुकान सगळे चालू आहे. किराणा चालू आहे मग शाळेपाशी तुमचं काय आलं आहे? सर्व मार्केट चालू असताना तुम्ही शाळा का बंद करता असा सवाल या महिलांनी केला आहे.

सुभाष पवार म्हणाले, रेगुलर पद्धतीने शाळा सुरू करावीत . शाळा बंद असल्यामुळे मुलं आमच्याबरोबर ऊस तोडणीसाठी आले आहेत. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी शाळा पूर्वीप्रमाणे चालू कराव्यात. गेल्या वर्षी माझा मुलगा चौथीला होता ऑनलाइन असल्यामुळे त्याला काहीही समजले नाही. यावर्षी पाचवीला आहे मात्र त्याला पुस्तक नाहीत. ऑनलाइनचा मुलांना काहीही समजत नाही. ऑफलाइन शाळा सुरू कराव्यात जसे आम्ही ऊस तोडतो तसे आमच्याही मुलांना ऊस तोडायला लावायची आहे की काय ? आमचे मुलं काहीतरी शिकतील हुशार होतील त्यामुळे सरकारनं शाळा चालू कराव्यात.

रमेश पवार (पालक) म्हणाले, दोन वर्षापासून मुलांना शाळेचे कसलाही ज्ञान नाही. मोठमोठे मोबाईल वापरून सुद्धा मुलं वेगवेगळे गेम खेळत बसतात. त्यामुळे शासनाने शाळा सुरू कराव्यात. आम्ही ऊस तोडायला येत असल्यामुळे आमची मुलं ही आमच्या बरोबर येत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ची शाळा चालू कराव्यात अशी आमची कळकळीची विनंती आहे. पाया जर पक्का नसेल तर बिल्डिंग रही पक्की होते. मात्र मुलं जर शाळेपासून वंचित राहिले तर त्यांच्यावरही अशीच ऊस तोडायची पाळी येईल. कुंभार जोशी मडके घडवतो तसे मुलांना शिक्षक घडवत असतात मात्र शाळा जर भरले नाहीत तर भविष्यातील पिढी घडणार कशी असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

विद्यार्थी आदित्य रमेश पवार म्हणाला, ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे आम्हाला त्याचे काहीही कळत नाही. पूर्वीप्रमाणे शाळा सुरू झाल्यास आमच्या लक्षात येते पूर्वीप्रमाणे शाळा सुरू झाल्यास आम्ही शाळेत जाऊन व शाळा सुरू नसल्यामुळे आम्ही आई-वडिलांबरोबर ऊस तोडणीसाठी आलेलो आहोत.

दुसरा विद्यार्थी निखिल सुभाष पवार म्हणाला, शाळा बंद असल्यामुळे आम्ही मम्मी पप्पा बरोबर ऊस तोडायला आलेलो आहोत. सर आम्हाला ऑनलाइन अभ्यास सोडतात. पण आम्हाला त्यातलं काहीही कळत नाही. गेल्या वर्षी चौथीला होतो. त्याचं काही कळालं नाही मात्र यावर्षी पाचवी ला आलो आहे. आता आमच्याकडे पुस्तकं सुद्धा नाहीत. आम्हाला ऑनलाइन अभ्यास कळत नाही धडा कोणता आहे तो सुद्धा कळत नाही.

Updated : 2 Feb 2022 4:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top