Home > मॅक्स रिपोर्ट > बेरोजगारीचे बीड जिल्ह्यातील तरुणांपुढे मोठे संकट...!

बेरोजगारीचे बीड जिल्ह्यातील तरुणांपुढे मोठे संकट...!

बीड जिल्हा म्हटलं की ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच बीड जिल्ह्यात अनेक तरुण शिकून-सवरून शिक्षण पूर्ण करून सुशिक्षित झाले आहेत तर या तरुणांना रोजगार नसल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत कारण बीड जिल्ह्यामध्ये एम आय डी सी नसल्यामुळे उद्योगधंदे नसल्यामुळे या तरुणांना रोजगार नाही. त्यामुळे इथल्या तरुणांना बेरोजगार सामना करावा लागत आहे..प्रतिनिधी हरिदास तावरेंचा रिपोर्ट..

बेरोजगारीचे बीड जिल्ह्यातील तरुणांपुढे मोठे संकट...!
X

बीड जिल्हा म्हटलं की ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.याच बीड जिल्ह्यात अनेक तरुण शिकून-सवरून शिक्षण पूर्ण करून सुशिक्षित झाले आहेत तर या तरुणांना रोजगार नसल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. कारण बीड जिल्ह्यामध्ये एम आय डी सी नसल्यामुळे उद्योगधंदे नसल्यामुळे या तरुणांना रोजगार नाही.त्यामुळे इथल्या तरुणांना बेरोजगार सामना करावा लागत आहे... बीड जिल्ह्यात पाच ठिकाणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी जागा आरक्षित केल्या आहेत त्यामध्ये बीड 68. 53 हे. त्यामध्ये 239 भूखंड आहेत, पाटोदा 13.19 हे. त्यामध्ये 24 भूखंड आहेत, माजलगाव 168.69 हे त्यामध्ये 191 भूखंड आहेत, आष्टी 15 हे .त्यामध्ये 53 भूखंड आहेत, धारूर 11.55हे त्यामध्ये 74 भूखंड आहेत...

त्याचबरोबर बीड याठिकाणी 150 उद्योग, पाटोदा-1, आष्टी -5, धारूर-8, माजलगाव-2 चालू आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या बीड कार्यालयातील संध्या लुलेकर यांनी दिलेली आहे... त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी एम आय डी सी जागा आरक्षित केली आहे त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची अडचण येत आहे. व काही ठिकाणी तर पाणीच उपलब्ध नाही त्यामुळे अडचणी येत असल्याची माहिती सुद्धा लुलेकर यांनी दिलेली आहे...






माझे शिक्षण बीएससी झालेले आहे सध्या जर पाहिलं तर नोकरीची संधी कुठेच नाही. कारण बीड जिल्ह्यात एमआयडीसी नाही आणि शासकीय नोकऱ्या सुद्धा मिळत नाहीत गेल्या 5 वर्षापासून मीसुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहे. आज मला असं का अनुभव आला की काही मुलं वाळूवर खेळत असताना मी त्यांना म्हणालो की मुलांनो वाळू गरम आहे .तुम्ही त्याच्यावर खेळू नका तर त्या मुलांनी मला काका म्हणाले व मला वाटलं माझं काही खरं नाही. कारण मला मी काका झालो आहे कारण मला अजून काकीच मिळाली नाही. नोकरीच्या शोधात काका झालो चार वर्षांनी तर आता आजोबाचं होतो की काय... त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शासकीय नोकऱ्या तर मिळणं मुश्किल झालंय आणि बीड जिल्ह्यात एमआयडीसी नसल्यामुळे नोकऱ्या नाहीत. बीड जिल्ह्यात एम आय डी सी ची जागा आहे पण त्याठिकाणी कारखाना नाही कंपनी नाही.त्यामुळे खाजगी नौकरी करण्याची पण संधी नाही बीड जिल्ह्यात असे त्यांनी सांगितले.

सध्या माझे वय 26 असून अजून माझे मोठे बंधू आहेत त्यांचं वय माझ्या पेक्षा जास्त आहे.त्यामुळे त्यांचच लग्न झालेलं नाही कारण नोकरी नाही आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले आहोत शेवटी कोयता हातात घेऊन ऊस तोडायची पाळी येते.आणि अगोदरच आपल्या बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आता काही दिवसानंतर बीड जिल्ह्याची ओळख ही बेरोजगारांचा जिल्हा म्हणून ओळख होईल. कारण नोकरीची याठिकाणी कोणतीच संधी नाहीत असे करण पंडित पाटील म्हणाले.






माझं शिक्षण एम ए झालेलं आहे मी बऱ्याच दिवसापासून अभ्यास करीत आहे. सरकारी चे नाव नोकरीचे मी अनेक वेळा प्रयत्न केले पण या कोरोना तीन वर्षाच्या काळामध्ये नोकर भरती झाली नाही या काळामध्ये बऱ्याच भरत्या सरकारने केल्या नाहीत अशी माझी सरकारला विनंती आहे. सरकारला माझी अशी विनंती आहे कि आम्हाला कुठेतरी रोजगार मिळावा किंवा आमच्या तीन वर्षातील वाया गेले आहेत ते भरून घ्यावी विशेष म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यातल्या एम आय डी सी नाही त्याचबरोबर आम्ही जर कोणत्या बाहेर जिल्ह्यात काम पाहण्यासाठी गेलो तर त्याठिकाणी येथील तरुणांच्या जागा आरक्षित असतात.त्यामुळे आम्हाला तिथं नोकरी मिळत नाही त्याचबरोबर अशी तीन वर्षे वाया ला जाऊन सरकार अजून कोणतीच भरती काढायला तयार नाही नोकर भरती करून आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे. की कमीत कमी पोलीस भरती तरी घ्यावी आम्ही काही फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये पशुसंवर्धन व इतर विभागांमध्ये तसेच आरोग्य विभागामध्ये तर घोटाळाच झाला आहे सरकारने सांगितला आहे की गट- ड आणि गट-ब ची भरती परिक्षा पुन्हा घेऊन व त्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात जेणेकरून आमचे वय संपत आलेलं आहे त्याचबरोबर यापुढे आम्हाला कोणी रोजगारही देऊ शकत नाही. आणि आम्ही शेतामध्ये ही काम करण्याच्या लायकीचे राहू शकत नाही अशी आमची दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे आमची सरकारला अशी विनंती आहे की नोकरी किंवा रोजगार कुठेतरी आम्हाला द्यावा असे श्रीधर मच्छिंद्र कांबळे म्हणाले.

मी एक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे बीड धारूर पाटोदा आष्टी किंवा बीड शहरातील एमआयडीसी जी जागा आहे ती पूर्णपणे कब्जा करून रिक्त ठेवण्यात आलेले आहे बीड मध्ये फक्त पाच ते दहा कंपन्या चालू आहेत याच्या मध्ये किती सुशिक्षित मुलं काम करतील किती जणांचा उदरनिर्वाह भागेल.…? या गोष्टीकडे कोणी लक्ष द्यायला तयार आहे का नाही....? यावर खासदार आमदार मंत्री कुणी लक्ष द्यायला तयार आहेत का नाही...? या गोष्टीचा सर्वात मोठा मोठा प्रश्न पडला आहे... म्हणून बीड जिल्ह्यातील तरुण नोकरीला खेटा मारून मारून अगदी बेजार झाला आहे त्यांच्या हाताला काम नाही काही तरुण तर व्यसनाधीन झाले आहेत म्हणून घेतले तरुण मुंबई पुणे या ठिकाणी स्थलांतरित होऊन त्यांचा उदरनिर्वाहाचं करण्याचं काम करत आहेत.मला या बीड जिल्ह्यातील तमाम नेत्यांना आव्हान करायचा आहे की नवीन तरुण पिढी कडे व नवीन सुशिक्षित वर्गाकडे लक्ष देतात का किंवा बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे तर नवीन लिही येणाऱ्या काळात व्यसनाधीनतेचा जिल्हा म्हणून घोषित करणार आहात का...? अशी एक माझी तुमच्याकडे मागणी आहे आणि रिक्त जागा आहे त्या ठिकाणी नवीन तरुणांना बँकांकडून देऊन किंवा निधी उपलब्ध करून देऊन एवढेच मला बीड जिल्ह्यातील नेत्यांना सांगायचं आहे असे नितिन सोनवणे म्हणाले.





बीड जिल्हा जसा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसा सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो जेवढे सुशिक्षित बेरोजगार बीड जिल्ह्यात आहेत तेवढे सुशिक्षित बेरोजगार हे बाहेरच्या जिल्ह्यात नाहीत नोकरीचे अर्ज भरून भरून अनेक तरुण एजबार झाले आहेत त्यांना नोकरी लागत नाही म्हणून आता त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे किंवा रोजगारासाठी पुणे-मुंबई किंवा इतर ठिकाणी जात आहेत कारण त्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी रोजगार निर्माण होत आहे आणि बीड जिल्ह्यातील जी एमआयडीसी आहे त्याची जागा बीड शहर वगळता इतर ठिकाणी ज्या जागा एमआयडीसीने आरक्षित केलेल्या आहेत त्या जागा जर या सुशिक्षित बेरोजगारांना मिळाल्या तर पण या एम आय डि सी च्या जागा अनेक वेळा फंड येऊन गेला निधी उपलब्ध होत आहे परंतू हा निधी कुठे जातो माहित होत नाही या ठिकाणी दीड शहरात जी एमआयडीसी आहे धनदांडग्या लोकांनाच जागा मिळतात पण एम आय डी सी च्या जागा या सुशिक्षित बेरोजगारांसाठी आहेत का...? गरिबासाठी आहेत का फक्त धनदांडग्या साठीच आहेत...? हा सुद्धा प्रश्न आहे आणि बीड मधील ज्या एम आय डि सी च्या जागा आहेत त्या थोड्याफार प्रमाणात कंपन्या आहेत मात्र जास्तीत जास्त जागेवर तर घरे बांधली आहेत पण या जागेवर जर सुशिक्षित बेरोजगारांना ही जागा उपलब्ध करून दिली तर सुशिक्षित बेरोजगार आपल्या शहरातून दुसर्‍या शहरात जाणार नाहीत बीड जिल्हा हा सुशिक्षित बेरोजगारांचे माहेरघर झालं आहे एक वेळा पाहतो की काही तरुण की अनेक नेत्यांच्या मागे जाऊन व्यसनाधिन होत आहेत त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य यामुळे धोक्यात आहे त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे घेतले तरुण आपला जिल्हा सोडून दुसऱ्या इतरत्र जिल्ह्यात रोजगारासाठी जातात याकडे लक्ष दिले पाहिजे त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे कमीत कमी नोकरी देऊ शकत नाहीत तर रोजगार तरी उपलब्ध करून द्या... असे प्रशांत वासनिक म्हणाले.

बीड जिल्हा उद्योग व्यवसाय असल्यामुळे जास्तीत जास्त तरुण हे ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत शिक्षणाचा स्तर तर या कोरोना काळामध्ये कमी झालेला आहे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत आणि उद्योग व्यवसाय बंद पडलेले आहेत बेरोजगारी वाढल्यामुळे व उद्योगधंदे बंद पडल्यामुळे अनेक तरुण तर बीड शहरामध्ये वेड्यासारखी फिरताना दिसत आहेत शहरातील एमआयडीसी सोडता कुठेही जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत बीड शहरातील उद्योग धंदे हे हातघाईला आलेले आहेत.





बेरोजगारीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत नेत्यांनी त्या जागा आपल्या संस्थेच्या नावावर केलेल्या आहेत आपला बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील अर्धे नेते घडवणारा जिल्हा आहे यामध्ये मंत्री-संत्री अनेक नेते आपल्या बीड जिल्ह्याने घडविले आहेत हे नेते मात्र तरुणांना हातात झेंडे हातात देतात पण कुणीही या तरुणांच्या हाताला काम देत नाही.... एमआयडीसी च्या नावाने ज्या आरक्षित जागा घेतलेल्या आहेत त्या जमिनी हरपून बसले आहेत त्यामुळे याठिकाणी उद्योगधंदे सुरू झालेले नाहीत बरोबर महाराष्ट्र शासनाच्या अनेक अनुदानित योजना येतात त्यांनी गिळंकृत केलेल्या आहेत त्यामुळे बेरोजगारी संपलं असं वाटत नाही प्रशासना मधले जे काही लोक आहेत ते हि या गोष्टीकडे म्हणावे तसे लक्ष देत नाहीत बेरोजगारी वाढणार आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढणार आणि ती बीड जिल्ह्याला न परवडणारी आहे वेळीच नेत्यांनी व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून औद्योगिक उद्योग कसे सुरु करता येतील एम आय डी सी साठी जागा आरक्षित केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी कसे उद्योगधंदे सुरू करता येतील जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्या हाताला कसे काम देता येतील हे शासनाने व नेत्यांनं पाहावं....असं रामनाथ खोड म्हणाले.

Updated : 13 May 2022 8:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top