Home > Top News > लोडशेडींगचा रसवंतीगृहाला फटका

लोडशेडींगचा रसवंतीगृहाला फटका

राज्यातील वाढत्या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांबरोबरच छोट्या उद्योगांनाही बसू लागला आहे. पावणेदोन लाख रुपये गुंतवणूक करून रोज मिळतात तीनशे रुपये मग हा रसवतींचा व्यवसाय चालवायचा कसा...? माझ्याच उसाचा रस पिताना मला दुःख होत आहे...!रात्रंदिवस मेहनत करून ऊस शेतातच उभा...? अशा उद्विग्न भावना व्यक्त होत आहेत, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा ग्राउंड रिपोर्ट

लोडशेडींगचा रसवंतीगृहाला फटका
X

राज्यातील वाढत्या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांबरोबरच छोट्या उद्योगांनाही बसू लागला आहे. पावणेदोन लाख रुपये गुंतवणूक करून रोज मिळतात तीनशे रुपये मग हा रसवतींचा व्यवसाय चालवायचा कसा...? माझ्याच उसाचा रस पिताना मला दुःख होत आहे...!रात्रंदिवस मेहनत करून ऊस शेतातच उभा...? अशा उद्विग्न भावना व्यक्त होत आहेत, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा ग्राउंड रिपोर्ट




लोडशेडींगचा फटका छोट्यामोठ्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात बसत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करूनही पाहिजे तेवढा नफा गुंतवणूकदाराला मिळत नाही त्यामुळे चे गुंतवणूकदार आहेत हे लोडशेडिंगमुळे अडचणीत आले आहेत कारण लाईट कधी येते तर कधी जाते यामुळे याचा फटका छोटे-मोठे व्यवसाय करणारे रसवंती चालक तसेच सर्वसामान्य नागरिकांना ही मोठ्या प्रमाणात बसत आहे.

आम्ही उसाचा रस 10 रुपये ग्लास विकतो याचे दरही वाढले पाहिजेत. कारण पेट्रोल वाढत आहे. शेतकऱ्यांचा ऊस जात नाही म्हणून आम्ही ऊस जाऊन आणत आहोत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्या आहेत, त्यामुळे रसाचा भावही वाढला पाहिजे. आम्हाला दररोज दोन ते तीन लिटर पेट्रोल लागत आहे. लाईट सतत येत जात आहे. त्यामुळे सारखा बेल्ट सोडवायचा आणि उतरायचा यामुळे आमचा वेळ वाया जातो. त्याचबरोबर काही वेळा तर आमचे ग्राहकही उठून जातात. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे, सध्या लोडशेडींग असल्यामुळे लाईट कधी येते जाते हे सांगता येत नाही. कसं करायचं पेट्रोलचे दरही वाढले आहेत आम्हाला जे पैसे शिल्लक राहिले होते ते राहत नाहीत. पेट्रोल 122 रुपये लिटर झाले आहे झोप न पाहायचा होता तो आता राहत नाही डिझेलाच सगळा खर्च चालला आहे. चार पाचशे रुपये नफा राहत होता.आता फक्त तीनशे रुपये राहत आहे. यामध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून उपयोग काय मी आतापर्यंत पावणेदोन लाख रुपये यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, असे रसवंती चालक सुभाष यादव म्हणाले.




आम्ही या ठिकाणी रस पिण्यासाठी आलेलो आहोत. रसाचा भाव वाढलेला आहे पण उसाचा जो भाव आहे तोच आहे. पावसाचा भाव जरी वाढला असला तरी रसवंती चालक पेट्रोल वरती चालवत आहेत. पेट्रोल जाळत आहेत कारण तो त्यांचा व्यवसाय आहे. पण या सर्व गोष्टीला कोण जिम्मेदार आहे हे कळायला मार्ग नाही यत्यांना व्यवसाय करायचा आहे ते तर करणारच बाकीच्या लोकांना पण त्याचा त्रास होत आहे. पण याची जिम्मेदारी कोणी घेत नाही सर्वत्र महागाई वाढत आहे पेट्रोल की सगळं वाढत आहे मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसा बद्दल जर बोलायचं झालं तर अवघडच आहे. काही उस बाहेरच्या कारखान्याला चालले आहे काही ऊस तोड कामगार आहेत. त्यांना उन्हामुळे त्याचा त्रास होत आहे तिचे पैसे मागत आहेत पण शेतकऱ्याला अठराशे 1900 भाव पडत आहे त्याच्यावर अजून खर्च मागत आहेत परिस्थिती फार वाईटच आहे सर्वसाधारण माणसाचं तर विचारायची गोष्ट नाही असे ग्राहक चंद्रकांत नेवडे म्हणाले.




शेतकऱ्यांचा ऊस शेतीमध्ये उभा आहे त्याला पाण्याची व्यवस्था नाही लोडशेडींग असल्यामुळे त्याला लाईट भेटत नाही.रात्रंदिवस मेहनत करूनही त्याचं काहीही मोल व्हायचं दिसत नाही..? आजपर्यंत आमच्याकडे पन्नास ते पंचवीस टक्के लोकांचा ऊस शिल्लक आहे .उसाचं काय होईल आणि काय नाही हे सांगता येत नाही. आणि पूर्णतः शेतकरी त्याच्यामध्ये अडचणीत आहे काही ऊस रसवंती ला जात आहे तर काही कारखाने पंधराशे रुपये मागत आहेत. ऊस तोडायला लेबर एकरी दहा हजार रुपये मागत आहे.वाहन चालक प्रत्येक ट्रीपला पाचशे ते हजार रुपये ट्रीप मागत आहेत .आणि हे आता कुठपर्यंत चालणार आहे..? काही कुठे न्याय मिळणार आहे की नाही.




आज माझ्याच उसाचा रस मला पिताना फार दुःख होत आहे .उसाचा रस पिताना पिऊ वाटत नाही कारण शेतामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात उभा आहे .या ठिकाणी पण यांना लाईटची व्यवस्था नाही. जनरेटर सुरू करून त्यांना रस काढावा लागत आहे .आणि तो रस पिण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे .वाईट परिस्थिती शेतकऱ्यांचे आहे .आज मी ग्रामीण भागात राहत असून रात्री रात्रभर लाईट नव्हती . सकाळी दहा वाजेपर्यंत येणार नव्हती व आता दोन वाजता पुन्हा लोडशेडिंग सुरू होणार आहे. त्यामुळे दिवसभर तर नाहीच आणि रात्रभर ही नाही असंच आम्हाला राहावे लागत आहे. जिम्मेदार सरकार आहे कारण त्यांचे आडमुठे धोरण आहे. त्यामुळे याला जम्मेदार सरकार आहे धोरणाचा चुकीची आहेत त्यामुळे याचा पश्चाताप सर्वांना होत आहे यापेक्षा काही वेगळे दुःख नाही सांगता येणार.. असे शेतकरी रामप्रसाद गाडेंनी सांगितले.





Updated : 18 April 2022 6:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top