News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > पैशाच्या हव्यासापोटी पत्नीने दिली पतीची सुपारी

पैशाच्या हव्यासापोटी पत्नीने दिली पतीची सुपारी

पैशाच्या हव्यासापोटी पत्नीने दिली पतीची सुपारी
X

वटपौर्मिमेच्या दिवशी सात जन्म एकच नवरा मिळावा अशी मागणी महीला करत असताना नवरा-बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या विम्याचे एक कोटी रुपये मिळावेत, यासाठी पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचून पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. बीडमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आलीय. या घटनेनं अख्खं बीड हादरलंय, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा ग्राऊंड रिपोर्ट
डोक्यात वार करुन पतीची हत्या करण्यात आली होती. पण अपघातामध्ये तो दगावला, असा बनाव रचला गेला होता. संशयास्पद घडामोडींनंतर पोलिसांनी या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला गेला. यानंतर पत्नीलाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना पत्नींही पतीच्या हत्येची सुपारी दिली असल्याचा कबुली जबाब दिलाय. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत माहिती देत हत्येचा खुलासा केलाय.

बीड शहरा पासुन जवळच असलेल्या म्हसोबा फाटा येथे एका अज्ञात इसमाचे प्रेत मिळुन आले होते. सदरची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक, सतिष वाघ, स्था.गु.शा. बीड यांना सदर घटनेची चौकशी व तपास करण्याचे आदेश दिले होते.

त्यावरुन त्यांनी सोबत पोउपनि संजय तुपे व निवडक पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन सदर घटनास्थळावर भेट देऊन बीड ग्रामीण पोलीसांसह समांतर तपास सुरु केला. सदर प्रकरणात कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना पोलीस पथकाने संशयावरुन पारंपारीक पध्दतीने तपास करुन सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा अटोकाट प्रयत्न केला.
घटनास्थळी पुरुष जातीचे प्रेत मिळुन आले. त्याचे बाजुस एक पांढऱ्या रंगाची विनानंबरची स्कुटी पडलेली दिसली. मयतास डोक्याला गंभीर मार लागला होता. घटनास्थळी अपघात झाल्याच्या खाना खुना दिसुन येत नव्हत्या. त्याठिकाणी बनावट अपघात केल्या सारखे दिसुन येत होते, अपघाताचे समाधान कारक पुरावे घटनास्थळावर दिसुन येत नव्हते. त्यामुळे पोलीसांचा जास्त संशय बळावला. मयताचे नांव मंचक गोविंद पवार रा. बीड असल्याचे समजले. प्रकरणी त्याची पत्नी व मुलगा यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यांचे वागणे बोलने हे संशयास्पद आढळुन आले. त्यानंतर पथकाने गोपनीय माहीतीच्या आधारे संशयीत श्रीकृष्णा सखाराम बागलाने वय 27 वर्षे रा. काकडहिरा ता.जि. बीड यास ताब्यात घेऊन त्यास विचापुस केली असता त्याने सांगितले की, सदर चा गुन्हा मी माझे सोबत इतर 3 यांनी मिळुन मयताची पत्नी गंगाबाई मंचक पवार हिचे सांगण्यावरुन केला आहे. तसेच आम्ही 4 जणांनी खुनाचा कट रचुन 10 लाख रुपयास खुनाची सुपारी घेऊन 2 लाख रुपये इसार घेतला होता.

दि.10.06.2022 रोजी मी व इतर 3 जणांनी मिळुन म्हसोबा फाटा ते पिपरगव्हण रोडचे कडेला पिपरगव्हण शिवारात दारु पित बसले. तेव्हा त्या ठिकाणी इतर 3 जणांनी त्यांचेकडील आयशर टेम्पो लांब लाऊन ते पायी आमच्या जवळ आले. त्यातील एकाने त्याचे हातात मोठा व्हिलपाना होतो. त्याने आल्याबरोबर व्हिल पान्याने मयत मंचक पवार याचे पाठीमागुन डोक्यात मारल्याने मंचक पवार खाली पडला. तोच पाना घेऊन सोमेश्वर गव्हाणे याने पुन्हा त्याचे चेहऱ्यावर एक फटका मारल्याने तो बेशुध्द पडला. त्यानंतर मी व इतर एक जणाने मंचक पवारचे हात पाय धरुन त्यास स्कुटीवर ठेवुन स्कुटी चालवत रोडवर घेऊन आलोत व त्याचा अपघात झाल्याचे भासवण्यासाठी रोडच्या कडेला स्कुटी उभा केली व सोमेश्वर गव्हाणे याने जवळच लावलेला आयशर टेम्पो क्र. एम.एच. 12 एल.टी. 3217 घेऊन येऊन स्कुटीवर बसवलेल्या मंचक पवार यास धडक दिल्याने मंचक पवार खाली पडुन स्कुटी थोडया अंतरावर जाऊन खाली पडली. तो मयत झाल्याची आम्ही खात्री करुन आम्ही सर्व तेथुन निघुन गेलोत. मी काकडहिरा येथे घरी गेलो तेथुन काकडहिरा शिवारात जाऊन रेल्वे पटरी जवळ माझ्या अंगावरील रक्त लागलेले पॅन्ट व शर्ट दोन्ही जाळुन टाकले. वगैरे माहीती देऊन गुन्हयाची कबुली दिली दिली आहे.

प्रकरणात पुढील तपासकामी इसम नामे 1. श्रीकृष्ण सखाराम बागलाने वय 27 वर्षे रा. काकडहिरा ता.जि. बीड, 2. सोमेश्वर वैजिनाथ गव्हाणे वय 47 वर्षे रा. पारगांव सिरस 3. गंगाबाई भ्र. मंचक पवार वय 37 वर्षे रा. वाला ता. रेणापुर जि. लातुर ह.मु. मिरगे रो हाऊस, अंकुशनगर बीड यांना ताब्यात घेतले व त्यांना पोलीसी खाक्या दाखवला त्यांनी कट रचुन खुन केल्याचे स्पष्ट कबुली दिली आहे. व सदर गुन्हयात इतर 2 आरोपी फरार आहेत पोलीस त्याचा कसोशिने शोध घेत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. सुनिल कृष्णा लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड, श्री वाळके करत आहेत.
Updated : 2022-06-14T15:01:40+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top